Share

राजकुमार रावने पत्नीसोबत शेअर केला मिरर सेल्फी, युजर्सनी अश्लील कमेंट केल्यानंतर डिलीट केली पोस्ट

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने नुकतीच त्याच्या पत्नीसोबतचा एक फोटो (Rajkumar Rao Posts Mirror Selfie With Wife) सोशल मीडियावर शेअर केला. यामध्ये तो मिरर सेल्फी घेताना दिसून आला. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. पण याच फोटोमुळे त्याला नेटकऱ्यांच्या टीकेलाही सामोरे जावे लागले. त्यामुळे राजकुमार रावने तो फोटो डिलीट केला. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.

राजकुमार रावने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर पत्नी पत्रलेखासोबतचा फोटो शेअर केला होता. यामध्ये पत्रलेखा व्हाईट शॉर्ट ड्रेस घालून आरश्यासमोर बसली आहे. तर राजकुमार राव मिरर सेल्फी घेत आहे. पण फोटो पाहून सुरुवातीला लक्षात येत नाही की, पत्रलेखा कशापद्धतीने बसली आहे.

त्यावरूनच लोकांनी राजकुमार रावला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेक लोकांनी त्याच्या या फोटोवर अश्लील कमेंट केले. त्यानंतर सोशल मीडियावर होणारी ट्रोलिंग पाहता राजकुमार रावने हा फोटो डिलीट केला. मात्र, तोपर्यंत हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

राजकुमार राव आणि पत्रलेखा जवळपास ११ वर्ष एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ते दोघे विवाहबंधनात अडकले. चंदीगढमध्ये त्या दोघांचा विवाहसोहळा पार पडला असून या लग्नात दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

दरम्यान, पत्रलेखा अभिनेत्री म्हणून अनेक चित्रपटात काम केली आहे. सध्या ती चित्रपटांपासून दूर आहे. तर दुसरीकडे राजकुमार रावच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास लवकरच तो भूमी पेडणेकरसोबत ‘बधाई दो’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ‘बधाई हो’ चा सिक्वेल आहे.

नुकतीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तर ११ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. याआधी राजकुमार रावचा ‘हम दो हमारे दो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये कृती सेनन, परेश रावल आणि रत्ना पाठक शाह मुख्य भूमिकेत होते.

महत्त्वाच्या बातम्या :
‘माझ्या ब्रा चं माप देव घेतोय’ म्हणणाऱ्या श्वेता तिवारीविरोधात गुन्हा दाखल, थेट गृहमंत्र्यांनी घेतली दखल
प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच…! ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक आऊट
श्वेता तिवारीचे वादग्रस्त वक्तव्य; अंडरगारमेंटला देवाशी जोडले, म्हणाली, ‘देव माझ्या ब्रा ची…’

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now