Share

राजकुमार रावची झाली फसवणूक, स्वतःच पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाला, कोणीतरी माझ्या नावावर..

rajkumar rao

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावसंदर्भात (Rajkumar Rao) एक मोठी बातमी समोर येत आहे. राजकुमार राव पॅन कार्डसंदर्भातील एका फसवणुकीचा शिकार झाला असून त्याच्या नावावर कोणीतरी कर्ज घेतला आहे. यासंदर्भात स्वतः राजकुमार रावने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. तसेच यासंदर्भात त्याने इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड (CIBIL) च्या अधिकाऱ्यांना एक पत्र लिहित यासंदर्भात चौकशी करण्याची विनंती केली आहे.

राजकुमार रावने त्याच्या ट्विटर हँडलवर एक ट्विट केला आहे. त्यामध्ये त्याने लिहिले की, ‘फ्रॉड अलर्ट! माझ्या पॅन कार्डचा दुरुपयोग झाला आहे. कोणीतरी माझ्या नावावर २ हजार ५०० रूपयांचा छोटा कर्ज घेतला आहे. याचा परिणाम माझ्या सिबिल स्कोर (Cibil Score) वर होत आहे’.

ट्विटमध्ये पुढे त्याने CIBIL च्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग करत या प्रकरणाबाबत चौकशी करण्याची विनंती केली आहे. तसेच यापुढे असा प्रकार होणार नाही, याकडेही लक्ष देण्याची विनंती केली आहे. राजकुमार रावच्या या पोस्टने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकजण तो गंमत तर करत नाहियेना? असा प्रश्न त्याला विचारत आहेत.

https://twitter.com/RajkummarRao/status/1510116104341192706?s=20&t=9y0fq9NSpRJ4Lr8waKwDxQ

दरम्यान, CIBIL च्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे राजकुमार रावला प्रतिक्रिया देण्यात आली आहे. यामध्ये लिहिण्यात आले की, ‘तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत. तुम्हाला असा अनुभव यावा, असे आम्ही अजिबात इच्छित नाही. आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत की, कृपया तुमच्या TUCIBIL अहवालात दर्शविणारा चुकीचा खाते क्रमांक आम्हाला पाठवा’.

राजकुमार रावच्या पूर्वी फेब्रुवारीमध्ये अभिनेत्री सनी लियोनीनेसुद्धा पॅन कार्ड संदर्भातील फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. तक्रारीत तिने म्हटले होते की, तिच्या पॅन नंबरच्या आधारे कोणीतरी तिच्या माहितीविना २ हजार रूपयांचा कर्ज घेतला आहे. त्यामुळे याचा तिच्या सिबिल स्कोरवर परिणाम झाला आहे.

दरम्यान, राजकुमार रावच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास तो ‘बधाई दो’ या चित्रपटात शेवटचा दिसला. लवकरच तो ‘हिट’, ‘मोनिका’, ‘ओह माय डार्लिंग’, ‘भीड’ या चित्रपटात दिसणार आहे. अद्याप या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली नाही. पण यावर्षी हे चित्रपट प्रदर्शित होतील, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
अभिनेता राजकुमार रावच्या नावावर भलत्यानेच घेतलं कर्ज, पॅनकार्डचा वापर करत घातला गंडा, अभिनेताही झाला हैराण
PHOTO: नऊवारी साडी, नाकात नथ, हातात बांगड्या, श्रद्धा कपूरचा महाराष्ट्रीयन लुक पाहून चाहते घायाळ
KKR Vs PBKS च्या मॅचमध्ये रसेलने मारले ८ सिक्सर पण चर्चा मात्र सुहाना खानचीच; व्हायरल झाले बोल्ड फोटो

बाॅलीवुड ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now