मागील अनेक दिवसांपासून साऊथ चित्रपटातसृष्टीत अनेक घटना घडत आहेत. साऊथचे अनेक कलाकार सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. यामध्ये मागील काही दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत, त्यांची मुलगी ऐश्वर्या, जावई धनुष हे खूपच चर्चेत होते. कारण काही दिवसांपूर्वीच अभिनेता धनुष आणि पत्नी ऐश्वर्या यांचा घटस्फोट झाला.
ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचे ही टेन्शन वाढले आहे. त्याचबरोबर घटस्फोटानंतर ऐश्वर्याला कोरोनाची लागण देखील झाली होती. या टेन्शनपासून दूर होताच रजनीकांत यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. त्याचे कारण देखील तसेच आहे. अभिनेता अल्लू अर्जुन यामागचे मुख्य कारण आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये अभिनेता अल्लू अर्जुनाचा ‘पुष्पा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने सध्या संपूर्ण भारताला वेड लावले आहे. त्याचबरोबर सर्वत्र याच चित्रपटाचा बोलबाला सुरू आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील डायलॉग देखील सुपरहिट झाले आहे.
अभिनेता अल्लू अर्जुन हा त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने सध्या यशाच्या शिखरावर आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे सध्या त्याची लोकप्रियता खूप वाढली आहे. त्यामुळेच ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचे टेन्शन वाढवले आहे. सध्या अभिनेता अल्लू अर्जुन सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्यामध्ये तो सर्वात जास्त ट्विटरवर सक्रिय आहे.
या कारणामुळे त्याच्या ट्विटरवरील फॉलोअर्सच्या आकड्यात वाढ झाली आहे. हा आकडा इतका वाढला की, ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनाही त्याने मागे टाकले आहे. ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना ६.१ मिलियन लोक फॉलो करतात. तर सध्या अल्लू अर्जुनला ६.५ मिलियन लोक फॉलो करत आहेत.
तर दिग्गज अभिनेता चिरंजीवी यांना १.२ मिलियन लोक फॉलो करतात. ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना फार कमी सेलिब्रिटीनी याबाबतीत मागे टाकले होते. मात्र आता अभिनेता अल्लू अर्जुनने मागे टाकले आहे. अल्लू अर्जुनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या त्याचा ‘पुष्पा’ हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. या मध्ये अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंधना देखील मुख्य भूमिकेत आहे.
महत्वाच्या बातम्या
रश्मिका झाली oops moment ची शिकार, पाय वर करताच दिसले असे काही की.., पहा फोटो
मृतांचा आकडा लपवणाऱ्या चीनचा बुरखा फाटला, गलवान झटापटीत चीनचे ३८ सैनिक झाले होते ठार
नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या बसचा आणि ट्रकचा भीषण अपघात, २० ते २२ विद्यार्थी गंभीर जखमी
“उत्पल पर्रीकरांना ३-४ जागांची ऑफर दिली होती, लढले असते तर मोठे नेते झाले असते”