Share

बॉस माझी लाडाची मालिकेला वेगळं वळण, राजेश्वरीने मिहीरसमोर ठेवली लग्नाची ‘ही’ विचित्र अट

एकत्र कुटूंब, कुटूंबातल्या गमतीजमती, एक हँडसम मुलगा मिहीर आणि एक स्ट्रीक्ट बॉस अशा वेगळ्या कथनकाची मालिका सोनी मराठीवर सध्या खूपच गाजते आहे. या मालिकेचा प्रोमो आला तेव्हा या कुटूंबातली कर्तबगार सून आणि कुटूंबाचा संवाद दाखवला होता. घरी सुनेचे कर्तव्य उत्तमरित्या बजावून कंपनी आणि घरी दोन्हीकडे हीच सून बॉसिंग करताना दाखवली आहे.

प्रत्यक्षात मालिका सुरु झाली तेव्हा या मालिकेची नायिका राजेश्वरी हिची एक मोठी कंपनी असल्याचे दाखवले आहे. नायक मिहीर हा त्या कंपनीत काम करणारा एक तरूण तडफदार आर्किटेक्ट असतो, असे दाखवले आहे. आता, गंमत बघा राजेश्वरीला कुटूंबच आवडत नसते. राजेश्वरी सध्या तिच्या आत्यासोबत रहात असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर दुसरीकडे इतकंच काय तर मिहीरच्या कुटूंबाबद्दल देखील माहित नसते. कारण नोकरी टिकवण्यासाठी मिहीरने आपल्याला कुटूंब नसल्याचे सांगितले असते.

अशातच राजेश्वरीला आपली कंपनी आणि घरावरचा वारसाहक्क टिकवायचा असेल लग्न करण्याची अट टाकण्यात आल्याचे कळते. आणि खरे कथानक इथून सुरु होते. राजेश्वरी, जिला लग्न, कुटूंब, नातीगोती या सगळ्याचा तिटकारा आहे, तिला अशी विचित्र अट घातली असल्याचे कळल्यावर तिचा संताप होतो.

यात ती मिहीरसोबत एक डील करण्याचा विचार करते. बिझीनेस आणि मॅरेजचे कॉंट्रॅक्ट करण्याचा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवते. आता हा प्रस्ताव मिहीर न स्वीकारण्याचा निर्णय मिहीरने घेतलाय. मग या दोघांचे लग्न कसे होणार? मालिकेत कोणते नविन रंजक वळण येणार? ही लाडाची बॉस लाडकी सून कशी होणार हे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now