अलीकडे करोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना पाहायला मिळत आहे. खबरदरीचा उपाय म्हणून राज सरकारने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. पुन्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी राज्यात पुन्हा कडक नियम किंवा मास्कसक्ती होणार का? असा प्रश्न सध्या राज्यात उपस्थित झाला आहे.
अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठे विधान केले आहे. भारतात कोरोनाचा नवा BA.4 आणि BA.5 व्हेरिअंट सापडला आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार का? अशा चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे.
अखेर यावर राजेश टोपे यांनी भाष्य केलं आहे. टोपे म्हणाले, “करोना नियंत्रणात आहे. रिकव्हरी टक्केवारी ९८ टक्क्यांवर आहे. लसीकरणाचे चांगले परिणाम दिसत आहेत. रुग्ण जास्त नसल्याने फार मोठा विषय नाही, चौथ्या लाटेची काळजी करण्याची गरज नसल्याचंही.”
पुढे बोलताना टोपे म्हणाले, ‘बूस्टर डोससंदर्भात केंद्र सरकारच्या सूचना आहेत त्याप्रमाणे, हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स, आपात्कालीन सेवेत काम करणारे कर्मचारी यांना बूस्टर डोस देण्यात येतोय. त्याचप्रमाणे वयोवृद्ध व्यक्तींना देखील बूस्टर डोस देण्यात येत आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.
मात्र इतर नागरिकांना बूस्टर डोस द्यावा, याबाबत केंद्र सरकारने सूतोवाच केला नाही. आणि याबद्दल आम्ही आग्रही नाहीये, असंही आरोग्यमंत्री यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे. राजेश टोपे याबाबत नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील करोना स्थितीवर भाष्य केले.
दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले, ‘संभाजीराजेंबद्दल आम्हाला सर्वांना आदर आहे. शरद पवारांशी, आमच्याशी सर्वांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. पक्षश्रेष्ठी आणि महाविकास आघाडी यासंदर्भातील स्पष्ट निर्णय घेतील”.
महत्त्वाच्या बातम्या
मराठमोळ्या लूकमध्ये सजली सचिनची लेक सारा; साडी, टिकली, नथ, गजरा आणि बरंच काही..; पहा फोटो
सारा तेंडुलकरने लग्नात मराठमोळ्या अंदाजात पार पाडले सगळे विधी, फोटोंनी उडाली खळबळ
मोठा खुलासा! मुंबईच्या विजयाचा हिरो टीम डेव्हिडला RCB ने सामन्याआधी पाठवला होता ‘हा’ मेसेज
अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलंत का? पहा क्युट ‘नुरवी’ चा पहिला फोटो