गेल्या दोन वर्षांपासून देशासह राज्यात करोना विषाणूने चांगलाच धुमाकूळ घातला. दिलासा दायक बाब म्हणजे आता राज्यात कोरोना प्रसार मोठ्या प्रमाणात कमी होताना पाहायला मिळत आहे. करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात अनेक निर्बंध लावल्यात आले होते.
मात्र आता कोरोना धोका कमी होतं असल्याने लावलेले नियम कमी करण्याबाबत राज्य सरकारने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. १ एप्रिलपासून करोनासंबंधीचे सर्व निर्बंध मागे घेण्यात येणार आहे. यासंबंधी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या आधीच नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध शिथील करण्याबाबत आरोग्यमंत्री टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी नियम पाळून सण साजरे करण्यास परवानगी देण्यात आल्याचे टोपे म्हणाले.
तसेच याचदरम्यान राज्यात मास्कमुक्ती करण्यात येणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे . मात्र मास्कमुक्तीचा विचार अद्याप केला नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. या पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना टोपे यांनी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध शिथील होणार का? याबाबत सांगितले आहे.
याबाबत बोलताना टोपे म्हणाले, ‘१ एप्रिलपासून आपत्कालीन कायदा मागे घेण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल. पण असं असलं तरीही मास्क वापरणं हे अनिवार्य आहे. मास्कशिवाय कोणीही बाहेर फिरताना दिसेल तर त्यांच्यावर कारवाई होईल अशीही माहिती टोपेंनी दिली आहे.
पुढे बोलताना टोपे म्हणाले, गुढीपाडव्याच्या मिरवणुकांना परवानगी देण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करून घेतील. शोभायात्रांबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, तसेच ते जनतेच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेतात, असे टोपे म्हणाले. तसेच मास्कमुक्तीचा सध्यातरी सरकारचा विचार नाही, तसेच मास्कमुक्तीचं धारिष्ट्य करणं तुर्त केलेले नाही असे टोपे यांवेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
कोरोनाचा हाहाकार! वुहाननंतर शांघाईमध्ये सर्वात मोठे लॉकडाऊन, माणसांसोबत प्राण्यांवरही लावले निर्बंध
हीच खरी माणुसकी! कर्मचाऱ्याच्या वडिलांचे निधन झाले, सांत्वनासाठी जॅकी श्रॉफ पोहचला पुण्यात
७५० कोटींची नोट विकायची आहे फक्त ५० लाखात, अजब आॅफर पाहून पोलीसही हैराण; पहा पुढे काय झालं…
“सुख म्हणजे नक्की काय असतं” मालिकेतील अभिनेता विवाहबंधनात; ‘या’ कलाकारांची हजेरी