बॉलीवूड इंडस्ट्रीत (Bollywood industry) रोज नवनवीन कलाकार येत आहेत, पण आजही जुन्या काळातील काही कलाकार आहेत, ज्यांना लोक विसरले नाहीत आणि कदाचित कधीच विसरणारही नाहीत. आजही कधी ना कधी जुन्या काळातील कलाकारांचा उल्लेख केला जातो. त्यातीलच इंडस्ट्रीचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) देखील आहेत.(Rajesh Khanna’s good fortune by buying a bungalow)
राजेश खन्ना आज आपल्यात नसतील, पण त्यांच्याशी संबंधित अनेक कथा आणि किस्से लोकांच्या स्मरणात आहेत. आज आम्ही तुम्हाला राजेश खन्ना यांच्याशी संबंधित असाच एक किस्सा सांगणार आहोत. हा किस्सा राजेश खन्ना यांच्या ‘आशीर्वाद’ या बंगल्याशी संबंधित होता. राजेश खन्ना यांनी हा बंगला त्यांच्या काळातील दिग्गज स्टार राजेंद्र कुमार यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांना विकत घेतला होता.
राजेंद्र कुमार यांनी हा बंगला विकत घेण्यापूर्वी लोक या दुमजली बंगल्याला ‘भूत बंगला’ म्हणत असत. मात्र, मुंबईतील कार्टर रोडवरील या बंगल्यात पाऊल ठेवताच राजेंद्र कुमार यांचे नशीब पालटले. अभिनेत्याचे जवळजवळ सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक आठवडे चालत असे. त्यामुळे राजेंद्र कुमार यांना ज्युबली स्टार असेही म्हटले जायचे. राजेंद्र कुमार यांनी या बंगल्याला ‘डिंपल’ असे नाव दिले आहे.
त्याच वेळी, काही काळानंतर राजेंद्र कुमार यांनी मुंबईच्या पाली हिल्स भागात दुसरा बंगला घेतला होता, ज्याचे नावही त्यांनी डिंपल ठेवले होते. राजेंद्र कुमार हे कार्टर रोडचा बंगला विकत असल्याची बातमी काकांना (राजेश खन्ना) मिळताच त्यांनी तो विकत घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. खरे तर खुद्द राजेश खन्ना यांचाही चमत्कारांवर विश्वास होता आणि त्यामुळेच त्यांनी हा बंगला विकत घेण्याचा आग्रह धरला होता. तसेच राजेश खन्ना यांच्या अपेक्षेप्रमाणेच घडले.
या बंगल्यात येताच राजेश खन्ना यांचे नशीब चमकले आणि ते देशातील पहिले सुपरस्टार बनले. राजेश खन्ना यांनी या बंगल्याचे नाव ‘आशीर्वाद’ ठेवले आहे. मात्र, राजेश खन्ना यांनी सर्वात वाईट काळही याच बंगल्यात घालवला हेही तितकेच खरे. 2012 मध्ये कॅन्सरशी लढत असताना राजेश खन्ना यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला होता.
महत्वाच्या बातम्या-
गरीब महिला निघाली तब्बल १०० कोटींच्या जमिनीची मालकीण, इन्कम टॅक्सचे अधिकारीही हैराण
रनवे ३४ ट्रेलर: जेव्हा पायलटने सिगरेट ओढल्यामुळे झाला होता ५१ लोकांचा मृत्यु, वाचा खरी कहाणी
..त्यामुळे दोन वर्षांपासून मी अंकिता लोखंडेच्या घरी घरजावई बनून राहतोय, विक्की जैनचा मोठा खुलासा
खेळायच्या वयात मुंबईच्या मुलाने उभी केली करोडोंची कंपनी, २०० जणांना दिल्या नोकऱ्या, वाचा यशोगाथा