Share

उद्धव ठाकरेंनी कोकणातील बड्या नेत्याला मातोश्रीवर बोलावून झाप झाप झापले; सेनेत पुन्हा राडा

udhav
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत उभी फुट पडली आहे. एकेकाळी एकमेकांच्या सोबत असणारे आता एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. अशातच आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधून नाराजीनाट्य समोर आलं आहे. राजापूर रिफायनरीवरून (Rajapur Refinery) शिवसेनेमध्ये (Shivsena) धूमशान सुरू असल्याच पाहायला मिळत आहे.

पहिल्यापासून नाणारमध्ये होत असलेल्या रिफायनरीला शिवसेनेने कडाडून विरोध केला होता, यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारला नाणारऐवजी राजापूरच्या बारसू, सोलगावमध्ये रिफायनरीसाठी जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता.

तर आता शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून पुन्हा रिफायनरी प्रकल्प चर्चेत आला आहे. बारसू, सोलगाव इथं रिफायनरी उभारणीला स्थानिक शिवसेना आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी समर्थन केल्यामुळे शिवसेना नेतृत्व नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साळवी यांनी घेतलेल्या समर्थनाच्या भूमिकेवरून उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. याचबरोबर साळवी यांनी राजापूरच्या रिफायनरीच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना मातोश्रीवर बोलावून आणि खडसावल्याची देखील माहिती मिळत आहे.

दरम्यान, पक्षश्रेष्ठींनी रिफायनरीला विरोध केल्यास आमदार राजन साळवी वेगळी राजकीय भूमिका घेण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आता यावरून शिवसेनेतील नाराजीनाट्य समोर आलं आहे. साळवींचं रिफायनरीला समर्थन हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याची शिवसेना नेत्यांनी म्हंटलं आहे.

मात्र भास्कर जाधवांना शिवसेना नेतेपद दिल्यामुळे साळवी नाराज आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे आता राजन साळवी यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साळवी यांच्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या
बंडखोर आमदार जयंत पाटलांच्या संपर्कात, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने सांगितली ‘अंदर की बात’
उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार म्हणणारे माजी खासदार शिंदे गटात सामील
Asia Cup: काय आहे जय शहा आणि तिरंगा वादाचे संपूर्ण सत्य? भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान असं काय घडलं?
PHOTO: २९ व्या वर्षी चित्रपटात पदार्पण, १७ वर्षात १० चित्रपट, आता ४६ व्या वर्षी केले बोल्ड फोटोशूट

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now