Share

VIDEO: RRR च्या सक्सेस पार्टीत नाटू नाटू गाण्यावर मनसोक्त नाचले राजामौली, पत्नीसोबत jr NTR आणि रामचरणने लावली हजेरी

एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटाने यशाचे झेंडे रोवले आहेत. राम चरण (Ram Charan) आणि जूनियर एनटीआर (Jr NTR) स्टारर चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. चित्रपटाच्या हिंदी वर्जनने रिलीजच्या 11 दिवसांत 190 कोटी (RRR box office collection) कमावले असताना, जगभरात 921 कोटींची कमाई केली आहे.

RRR च्या सक्सेस पार्टीमध्ये राम चरणने चित्रपटाच्या क्रू सदस्यांना सुमारे 18 लाख किंमतीची सोन्याची नाणी वाटली. सोमवारी चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. RRR च्या सक्सेस पार्टीत राम चरण आणि ज्युनियर एनटीआर आपल्या पत्नीसह पोहोचले. दिल राजू आणि शिरीष या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये रेड कार्पेट इव्हेंटमध्ये अनेक स्टार्स दिसले होते.

ज्युनियर एनटीआर आरआरआरच्या सक्सेस पार्टीला त्याच्या पत्नीसोबत पांढरा शर्ट आणि काळ्या पॅन्टमध्ये पोहोचला होता. त्याचवेळी राम चरणने पत्नीसोबत ब्लॅक आउटफिटमध्ये ग्रँड एन्ट्री केली. पण या कार्यक्रमात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे राजामौली यांच्या नाटू नाटू डान्सने.  एसएस राजामौली यांनी ज्युनियर एनटीआरला एका मुलाखतीत वचन दिले होते की ते नाटू नाटूचे हुक स्टेप करतील आणि त्यांनी ते वचन चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत पाळले.

एसएस राजामौली यांनी ही डान्स स्टेप अतिशय अप्रतिम पद्धतीने केली आणि सगळे पाहतच राहिले. RRR 25 मार्च रोजी रिलीज झाला. चित्रपटात ज्युनियर एनटीआरने कोमाराम भीमची भूमिका साकारली होती, तर राम चरण अल्लुरी सीताराम राजूच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगणसह इतर अनेक स्टार्स दिसले होते.

हा चित्रपट वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित झाला. RRR ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. याची झलक नुकतीच राम चरण गेटी गॅलेक्सी येथे पोहोचले तेव्हा पाहायला मिळाली. राम चरणाला पाहताच मोठा जमाव जमला आणि त्यांनी अभिनेत्याला पूर्णपणे घेरले.

RRRमुळे बॉलिवूड चित्रपटांना चांगलाच फटका बसला आहे. RRR ची लाट अशी आहे की ज्यामुळे जॉन अब्राहमच्या ‘अटॅक’ चित्रपटाला चांगलाच फटका बसला. हा देखील एक अॅक्शन चित्रपट असला तरी राजामौली यांनी ज्या पद्धतीने त्यांची कथा मांडली आहे त्यामुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 300 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या RRR या चित्रपटाने आतापर्यंत 900 कोटींचा टप्पा पार केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
एसटी कामगारांना हायकोर्टाचा झटका! विलीनीकरणाची मागणी फेटाळत दिला हा शेवटचा अल्टिमेटम
राजू शेट्टींचा एकला चलोचा नारा; महाविकास आघाडीला ठोकला रामराम, केली मोठी घोषणा
तुमच्या अशा वक्तव्यांची जागा केराच्या टोपलीत आहे; सर्वोच्च न्यायालयाने संजय राऊतांना फटकारले
सोमय्यांचा कोट्यावधींचा घोटाळा उघड, संरक्षणाच्या मुद्द्यावर निधी गोळा करून भ्रष्टाचार

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now