Share

राज ठाकरेंची बंडखोरांना मनसेत विलीणीकरणाची आॅफर; उद्धव ठाकरेंनी दिली पहीली प्रतिक्रीया, म्हणाले..

काल शिवडी विधानसभा मतदार संघातील शिवसेना शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना कुठल्या ना कुठल्या पक्षात विलीन व्हावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही असा दावा केला. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या एका विधानावर देखील नाव न घेता टोमणा मारला.

कालच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर आणि भाजपवर निशाणा साधला. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एक वक्तव्य केलं होतं, त्यावर देखील उद्धव ठाकरेंनी भाष्य करत राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, बंडखोरांना कुठल्यातरी एका पक्षात जावंच लागणार. ते कुठल्या पक्षात जाणार? काल त्यांना एका पक्षाने ऑफर दिली आहे , असे म्हणत हसले. तेवढ्यात खालून शिवसैनिकांमधून केमिकल लोच्या केमिकल लोच्या असे आवाज आले.

उद्धव ठाकरेंनी देखील शिवसैनिकांच्या सुरात सूर मिसळून किती जणांचा केमिकल लोच्या झाला असेल ते सांगता येत नाही असं हसत हसत म्हणाले. यावेळी त्यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर टोमणा मारला. त्यानंतर संपूर्ण शिवसैनिकांनी केमिकल लोचा अशी घोषणा सुरू केली.

राज ठाकरेंच्या ज्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंनी टोमला मारला तो म्हणजे, राज ठाकरेंनी मुलाखतीत म्हंटलं होतं की, ४० आमदारांचं विलिनीकरण हा तांत्रिक मुद्दा आहे. अनेक वर्तमानपत्रांमध्ये मी हा विषय वाचला. त्या आमदारांकडून विलिनीकरणाचा प्रस्ताव मी नक्कीच विचार करेन, असे राज ठाकरे म्हणाले होते.

उद्धव ठाकरेंनी भाषणात बंडखोरांवरही निशाणा साधला. म्हणाले, बाळासाहेबांचा फोटो न लावता मतं मागून दाखवा, निवडून येऊन दाखवा. बंडखोरांनी आपल्या आई-वडिलांसोबत राज्यात सभा घ्याव्यात, त्यांच्या नावावर मतं मागावीत. ज्यांना शिवसेनेने मोठं केलं तेच शिवसेना गिळायला निघाले आहेत.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now