सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांच्या वादात शिवसेनेवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांना आपल्या भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. नुकतीच विनायक राऊत यांनी टीव्ही ९ ला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, “केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांचा द्वेष राज ठाकरे यांच्या मनात भिनला आहे. राज ठाकरे यांची करणमूक करण्याची पद्धत जुनी आहे. भोंगा हा विषय देशपातळीवरचा आहे. याबाबत नियंत्रण आणायचे असेल तर केंद्राने कायदा करावा, भोंग्याचा विषय घेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी हा प्रश्न उचलला गेलाय”
तसेच, ” उद्धव ठाकरे साहेबांना त्रास द्यायचा या दुष्ट आणि कपट नितीने भाजपाची सुपारी घेऊन राज ठाकरेंनी केलेलं हे नाट्य आहे. कायद्याने जे करायचंय ते नक्कीच होईल. परंतु केवळ उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी हा प्रश्न उचलला असेल तर महाराष्ट्रातील जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.” असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.
पुढे बोलताना, “राज ठाकरेंची करमणूक करण्याची जी पद्धत आहे जुनी आहे. प्रत्येक निवडणुकीला करमणुकीचे कार्यक्रम घेण्यासाठी कुणाची तरी सुपारी घ्यायची. उद्धव ठाकरे यांच्याविषयीचा मनात द्वेष भिनल्यामुळे… स्वतःचा भाऊ मुख्यमंत्रीपदावर बसलेला पहावत नसल्याने हा चाललेला थयथयाट आहे. राज ठाकरे यांच्या दुष्ट आणि कपट नितीला भाजपाची साथ आहे” अशी टीका राऊत यांनी केली आहे.
दरम्यान यापूर्वी बोलताना, “राज ठाकरेंच्या वक्तव्याकडे आम्ही लक्ष देत नाही. कालची सभा आम्ही ऐकली पण नाही आणि पाहिलीही नाही. असे किती आले आणि किती गेले, शिवसेना आणि महाविकास आघाडीचे सरकार भक्कम राहील, या सरकारला कुणाचाही धोका नाही” असे विनायक राऊत यांनी म्हणले होते.
महत्वाच्या बातम्या
‘ताई काळजी करू नका, तो बरा आहे’; धनंजय मुंडेंनी अपघातग्रस्त तरुणाला दिले जीवदान
प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूने त्याच्याहून २८ वर्षांनी लहान मुलीसोबत जमवले लग्न; नाव वाचून धक्का बसेल
राहूल गांधींचा नाईट क्लबमध्ये ड्रिंक्स घेतानाचा व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते म्हणतात ते चीनच्या एजंटांसोबत…
अक्षय्य तृतीयेला सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजच्या आज करा बंपर खरेदी