राज्यात सुरु असलेल्या भोंग्याच्या वादात मनसेला भाजपने पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे सध्या मनसे, भाजपविरोध आघाडी सरकार असे समीकरण पाहिला मिळत आहे. भाजप भोंग्याच्या मुद्द्यांवरून मनसेसोबत राज्य सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कार भाजप कार्यालयासमोर दिसल्याने आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
सोमवारी राज ठाकरेंची कार भाजपच्या नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयाबाहेर उभी असल्याचे दिसून आले आहे. राज ठाकरे यांच्या गाडीचा नंबर एम. एच ४६ जे ९ असा आहे. ९ अंक हा राज ठाकरे यांचा लकी नंबर आहे. यापूर्वी देखील राज ठाकरे या कारमधून फिरताना दिसले आहेत. आता हीच कार भाजपच्या कार्यालयासमोर दिसली आहे.
त्यामुळे राज ठाकरे यांची ही कार भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर काय करत होती? राज ठाकरे इथे आले होते का? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. मात्र भाजप कार्यालयात राज ठाकरे आले नव्हते अशी माहिती सतीश कोठावळे यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ही कार एस.के मोटर्सचे मालक सतीश कोठावळे यांनी राज ठाकरे यांच्याकडून विकत घेतली आहे.
सोमवारी सतीश कोठावळे आपले सहकारी सहदेव पाटील यांना घेऊन भाजप प्रदेश कार्यालयात एका कामासाठी आले होते. यामुळेच भाजप कार्यालयाबाहेर ही कार उभी असलेली दिसून आली आहे. दरम्यान सध्या भोंग्याच्या वादात मनसे आणि शिवसेनेतील जवळीक चांगलीच वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन पक्षांमध्ये युती होऊ शकते का? अशा चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत.
राज्यात हिंदुत्वाचा वाद टोकाला पोहचला आहे. राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ४ मे पर्यंतचे अल्टिमेटम दिले आहे. परंतु सरकारने भोंगे उतरविण्यास ठाकरेंना नकार दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे सरकारवर आपला आक्रोश व्यक्त करताना दिसत आहेत. आता मनसे आणि सरकारच्या वादात भाजपने उडी घेतली आहे. भाजप राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करत सरकारवर टीका करताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
ब्रेकिंग! शिराळा कोर्टाकडून राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट जारी, अटक होण्याची शक्यता
पठ्ठ्यानं आतापर्यंत सोसायटी काढली नाही अन् पवार साहेबांवर बोलतोय; अजित पवारांची राज ठाकरेंवर घणाघाती टीका
आता काही खरं नाही! ठाकरेंना नडने पडले महागात; राणा दाम्पत्याच्या घरावरही गदा..
”जे हात भोंगे आणि लाऊडस्पीकर काढायला येतील ते परत जाणार नाहीत”