इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात जे आहेत ते योगी नसून भोगी आहेत, हे दुर्दैव आहे, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “मशिदीतून लाऊडस्पीकर्स काढल्याबद्दल मी योगी सरकारचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचा आभारी आहे, असे ट्विट त्यांनी केलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी ठाणे येथील उत्तर सभेत बोलताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे ३ मेपर्यंत न उतरविल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं असून आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.
राज यांनी मुख्यमंत्री योगी यांचे कौतुक केल्यानंतर आणखी एक मोठी बातमी मनसेच्या गोटातून समोर येत आहे. राज ठाकरे आता अयोध्या दौऱ्यासाठी जाणार आहेत तिथं ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटणार असल्याचे बोललं जातं आहे. यामुळे राज आणि मुख्यमंत्री योगी यांची भेट म्हणजे ज्वलंत हिंदुत्वाचा ‘राजयोग’ असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
अलीकडे राज यांनी घेतलेली बदलती भूमिका लक्षवेधी ठरतं आहे. यामध्ये भोंग्यांवरुन घेतलेली आक्रमक भूमिका असो किंवा हनुमान चालिसा-महाआरती असो. या भूमिका राज ठाकरे यांना हिंदुत्वाच्या अधिक जवळ घेऊन जात आहेत. तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ हे हिंदुत्ववादी आहेत.
दरम्यान, यामुळेच अयोध्या दौऱ्यात राज ठाकरे-योगी यांची भेट ज्वलंत हिंदुत्वाचा ‘राजयोग’ असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच खुद्द राज यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. ५ जून रोजी अयोध्येला जाणार असून श्री रामाचे दर्शन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.