Share

पहाटेच्या शपथविधीवर राज ठाकरे कडाडले, पण देवेंद्र फडणवीसांनी ‘यासाठी’ केलं कौतुक, म्हणाले…

काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शिवतीर्थावर गर्जना झाली. जवळपास एक तास केलेल्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, यांच्यावर सडकून टीका केली. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर आसूड ओढले. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ते आतापर्यंतच्या सरकारच्या कामगिरीवर राज ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं.

त्यांच्या संपूर्ण भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनाच फक्त टार्गेट केलं. यावेळी त्यांनी भाषणात भाजपचे कौतुक केले, त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर दाखवला. तसेच त्यांनी 2019 च्या विधानसभेची आठवण काढत महाविकास आघाडीच्या स्थापनेवर प्रश्न केले.

राज ठाकरे म्हणाले होते की, 2019 मध्ये भाजप सेना विरुद्ध कोण दोन काँग्रेस. निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला. अडीच अडीच वर्ष ठरली होती. आमच्याशी तर कधी बोलला नाही तुम्ही. ज्या सभा घेतल्या त्यातही कोणी बोललं नाही. मोदींची सभा झाली तेव्हा फडणवीस येतील असं जाहीर सांगितलं, मग अचानक हे कसं झालं. असं म्हणत उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं.

राज ठाकरे यांच्या या मुद्द्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज ठाकरे बरोबर बोलत आहेत. सर्वात मोठा पक्ष भाजप असून आज तो सत्तेतून बाहेर आहे. मात्र हे तीन पक्ष एकत्र येत लोकांची फसवणूक करत सत्तेत बसले आहेत, त्यामुळे राज ठाकरे अगदी सत्य बोलत आहेत, अशी प्रतिक्रिया देत, राज ठाकरेंचं वचन हे सत्य वचन असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

काल भाषणात राज ठाकरेंनी शिवसेनेने भाजपला फसवल्याचा थेट आरोप केला. म्हणाले, त्यावेळी जेव्हा मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शहा बोलले तेव्हाही उद्धव ठाकरे काही बोलले नाही, मग निकाल लागला आणि लक्षात आलं आपल्यामुळे सरकार अडतंय. त्यावेळी टूम काढली अडीच वर्षाचं काय झालं. कोणती? कधीची? असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे.

तसेच राज ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या खोलीत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली होती असे नेहमी सांगतात. पण, मला बोलायचे आहे की या गोष्टी बाहेर का नाही बोललात? मुख्यमंत्रिपद महाराष्ट्राचं, लोकांचं ती गोष्ट चार भिंतीत का झाली? असा सवाल त्यांनी केला आणि पहाटेच्या शपथविधीचाही खरपूस समचार घेतला.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now