Share

Raj Thackeray : ‘शिवरायांचं नाव घेतलं की मुस्लीम मतं जातील या भितीने शरद पवार शिवरायांचं नाव घेणं टाळतात’ – राज ठाकरे

sharad pawar raj thackeray

raj thackeray shocking statement on sharad pawar  | गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्रमक झाल्याचे दिसत आहे. ते सतत वेगवेगळ्या मुद्यांवरुन शरद पवारांवर टीका करताना दिसून येत आहे.

आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार हे व्यासपीठावर असताना फक्त शाहू-फुले-आंबेडकर यांचाच उल्लेख करतात, ते कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख करत नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे म्हणाले की, शरद पवारांनी आजपर्यंत व्यासपीठावर कधीही भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतलं नाही. शिवरायांचं नाव घेतलं की मुस्लीम मतं जातील अशी भिती त्यांना होती. या भितीने शरद पवार हे महाराजांचं नाव घेणं टाळत असतात.

तसेच शरद पवार नेहमी म्हणतात शाहू-फुले-आंबेडकर हा एक विचार आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज हा काही विचार नाही? शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा मूळ पाया हा शिवाजी महाराज हेच होते ना? असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

सध्या कोणीही छोटीशी गोष्ट बोलत आणि वाद निर्माण होतात. या सगळ्याचा वापर जातीच्या राजकारणासाठी केला जातो. यापूर्वी लोकांना इतिहास कळतच नव्हता का? आता यांनाच सगळा इतिहास अचानक कळायला लागला आहे का? महाराष्ट्रात हे सगळं १९९९ पासून राष्ट्रवादीच्या जन्मापासून सुरु झालं आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

शरद पवारांनी त्यांच्या भाषणात कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले नाही. शिवरायांचं नाव घेतलं की, मुस्लिम मतं जातील, असे त्यांना वाटते. मग कुठल्याही टोळ्या उभ्या करायच्या. त्यांच्याकडून शिवाजी महाराजांचं राजकारण करुन घ्यायचं. जेणेकरुन मराठा समाज आणि इतर घटकांमध्ये फूट पाडता येईल. मग दोन्ही बाजूंची मतं खिशात घालायची, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
ruturaj gaikwad : एका षटकात ७ षटकार ठोकण्यामागचं गुपित अखेर ऋतुराजने उलगडलं; म्हणाला, त्या व्यक्तीमुळे…
Uddhav Thackeray : राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एक महिला बसवायची आहे; उद्धव ठाकरेंनी सांगितली खास रणनीती
Rishabh Pant : 10 धावांची खेळी खेळून आलेला थकवा दूर करण्यासाठी पंत करून घेत होता मसाज; लोकांनी झाप झाप झापले

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now