Share

भोंग्याचे ‘राज’कारण : राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा ‘तो’ जुना व्हिडीओ ट्वीट; पहा व्हिडिओ

raj thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रक काढून मनसे कार्यकर्त्यांना आणि जनतेला भोंग्यांविरोधात आंदोलन तीव्र करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनसे कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईतील अनेक भागांत मनसैनिकांकडून मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं.

देशभरात प्रत्येक राज्यात आपापल्या सत्ताधाऱ्यांना हिंदुची ताकद दाखवून द्या, असा आदेश राज यांनी कार्यकर्त्यांना दिला. राज ठाकरेंनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे रात्रीपासून राज्यभरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे. तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.

आता भोंग्यांबाबत मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. अशातच राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी शिवसेनेला डिवचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

https://twitter.com/RajThackeray/status/1521694002197975040?s=20&t=pc5Bq7qAEha2bbHk1uCZIg

 

त्यामुळे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे हे भाषणादरम्यान, “ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल, त्यावेळेला रस्त्यावरील नामाज पठण बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की तो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये,” असं म्हणताना दिसत आहेत.

तर दुसरीकडे राज यांनी मंगळवारी सायंकाळी जारी केलेल्या पत्रकामध्ये आपली भूमिका स्पष्ट करताना मशिदीवरील सर्व भोंगे अनधिकृत आहेत. सरकार अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानग्या कशा देते. त्यांना परवानगी देणार असाल तर देवळांनाही परवानगी द्यायलाच हवी, असं म्हटलं आहे.

त्याचप्रमाणे, रस्त्यावर नमाजसाठी बसणे, वाहतूक कोंडी करणे कोणत्या धर्मात बसते. भोंग्यांचाही विषय हा प्रश्न धार्मिक नसून सामाजिक आहे. पण या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचे उत्तर धर्मानेच दिले जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

दरम्यान, आता राज ठाकरे यांच्याविरोधात कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. शिराळा कोर्टात राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना अटक होण्याची शक्यता आहे. मनसेच्या भूमिकेकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
जिथं अनाज तिथं जय हनुमान! …म्हणून मनसेने मानले मुस्लिमांचे जाहीर आभार; वाचा नेमकं काय घडलं
वातावरण बिघडवणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, औरंगाबादमध्ये ४८ मशिदींबाहेर कडक बंदोबस्त
मनसैनिकांनी केले राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन, राज्यात ठिकठिकाणी पहाटे हनुमान चालिसाचे पठण
सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी ‘ती’ कामवाली बाई आहे तरी कोण? पहा तिचे ग्लॅमरस फोटो

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now