आज गोरेगावातील मनसे शाखेचं (mns sakinaka) उद्घाटन करण्यात आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. यावेळी मनसे सैनिकांनी टाळ्याच्या गजरात राज यांच्या या सूचनेचं स्वागत केलं. तसेच यावेळी जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असोचा जयघोषही केला. (raj thackeray tage collapsed in goregaon mumbai)
या कार्यक्रमाला मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे स्टेजवर येत असताना कार्यकर्त्यांनीही स्टेजवर धाव घेतली. त्यामुळे स्टेजवर एकच गर्दी झाली आणि स्टेजचा मधला भाग अचानक कोसळला. त्यामुळे यात महिला अडकल्या गेल्या. पण मनसे कार्यकर्त्यांनी तात्काळ धाव घेऊन या महिलांना बाहेर काढलं.
राज ठाकरे स्टेजच्या पुढे होते त्यामुळे त्यांनाही काही झालं नाही. ही घटना घडल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं आणि काळजी घ्या असं कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यानंतर राज यांनी पायऱ्यांवर उभं राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी शिवजयंती तिथीनुसारच का साजरी करायची? या मागचे कारण सांगितले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, आपल्याकडे जेवढे सण येतात, ते आपण तिथीने साजरे करतो. तारखेने साजरे करत नाही. गेल्यावर्षी दिवाळी कोणत्या तारखेला होती. यावेळी दिवाळी त्याच तारखेला येत नसते. मागच्या वर्षी गणपती ज्या तारखेला आले त्याच तारखेला या वर्षी गणपती येत नसतात.
तसेच गणेशोत्सव तिथीनुसार येतो. त्यामुळे शिवजयंतीही तिथीनुसारच साजरी केली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. जन्म दिवस आणि वाढदिवस आपले. महापुरुषांचा तोही छत्रपतींचा जन्म दिवस आपल्यासाठी सण आहे. म्हणून तो सण तिथीने साजरा करायचा, असं राज म्हणाले.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मी भाषणाला उभा नाही. मी व्यासपीठावर येण्याचं एकमेव कारण तुमचं सर्वांचं दर्शन व्हावं आणि त्यासाठी मी व्यासपीठावर आलोय, मी काही हारतुरे घ्यायला आलेलो नाही. आज शिवजयंती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा शिवजंयती आपण तिथीने साजरी करतो, याचा अर्थ आज साजरी करायची असा नव्हे.”
राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना उद्देशून यावेळी टोला लगावला आहे. ‘लोकांना विश्वास वाटला पाहिजे की या शाखेत आल्यानंतर मला न्याय मिळेल. ही शाखा आहे दुकान नव्हे. त्यामुळे त्याचं पावित्र्य तुम्ही राखलं पाहिजे. एवढी फक्त मी तुम्हाला विनंती करतो,’ असे त्यांनी म्हंटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
हजारो लोकांना ऍसिडमध्ये बुडवून मारणारा कुख्यात गँगस्टर जेलमधून सुटला, १० वर्षांपासून भोगत होता शिक्षा
परकरच्या नाडीने आईनेच आवळला पोटच्या मुलाचा गळा, पोलिस तपासाच धक्कादायक कारण आले समोर
राज ठाकरे म्हणतात, “छत्रपतींचा जन्मदिवस म्हणजे आपल्यासाठी तो सण आहे आणि म्हणून तो…”
१० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ दोन शेअर्सनी गुंतवणूकदारांना दिले छप्परफाड रिटर्न, १ लाखाचे केले ३ कोटी