Share

राज ठाकरेंना सभेला पैसे देऊन लोक आणावे लागतील; सेनेच्या वाघाची जहरी टीका

सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादेत सभा आयोजीत करण्यात आली आहे. तर दुसरीकडे या सभेला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसून येत आहे.

त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात तणावपूर्ण वातावरण आहे. राज ठाकरे यांची १ मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणारच. चिल्लर संघटनांना कितीही विरोध करू द्या, आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही, अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी आपले मत व्यक्त केले.

राज ठाकरे यांच्या सभेला एक लाखाहून अधिक लोक येतील, असा दावादेखील त्यांनी केला. अशातच सेनेकडून मात्र या सभेला कडाडून विरोध करण्यात आला आहे. ‘मनसेच्या मागील मेळाव्यातही 300 रुपये देऊन लोकांना बोलवावे लागले,’ असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला पैसे देऊन लोक आणावे लागतील, असा दावा खैरे यांनी केला आहे. यामुळे आता यावर मनसेकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरवणार आहे.

दरम्यान, पुढे बोलताना खैरे म्हणाले, ‘शिवसेनेच्या अनेक सभा औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर गाजल्या आहेत. मात्र या ठिकाणी शिवसेनेच्या सभा मेळाव्यांना येण्यासाठी लोकांना कधीही पैसे देण्याची गरज पडली नाही. लोक स्वतःहून सभेला यायचे, असे ते म्हणाले.

मनसेकडून 1 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी होणाऱ्या औरंगाबाद येथील सभेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग, ऑल इंडिया पँथर सेना, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष आणि GAC संघटनांनी विरोध दर्शवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
अवघ्या १०० रुपयांत जोडप्याने खरेदी केलं घर; खोलीतून बाहेर पडताच समोरील दृश्य पाहून बसला मोठा धक्का
सात पराभवानंतरही मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीत का आहे? जाणून घ्या फॉरमॅटच नवं गणित
औरंगजेबासारख्या जुलमी लोकांनी आमची मुंडकी कापली पण तरीही आम्ही आमचा धर्म सोडला नाही
४५ वर्षांच्या वयातही हॉट दिसते ‘आओ राजा’ गाण्यातील चित्रांगदा, सुंदर दिसण्यासाठी पिते ‘हे’ खास ड्रिंक

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now