Raj thackeray on shinde group | राज ठाकरेंनी नुकतीच एक मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आणि अनेक मुद्द्यांवर आपले रोखठोक मत मांडले. राज ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेना फुटली. यावेळी त्यांनी एक असे वक्तव्य केले की ज्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
राज ठाकरेंना विचारण्यात आले की, एकनाथ शिंदेंचा गट मनसेत सामिल होऊ शकतो का? त्यावर राज ठाकरे म्हणाले की, मी शिवसेनेत बंड केले नाही. मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो. मी कुठल्याही दुसऱ्या पक्षात गेलो नाही त्यामुळे माझी तुलना बंडखोरांशी करू नये.
त्यावर शिंदे गट मनसेत सामिल करून घेणार का? त्यावर त्यांनी उत्तर दिले की, का नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार हे माझे जुने सहकारी आहेत. मी माध्यमांतून त्यांचा गट मनसेत विलीन होईल असे ऐकले. त्या तांत्रिक बाबी आहेत.
जर शिंदेंना गरज पडली तर आणि त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर मी त्या ४० आमदारांना मनसेत विलीन करण्याबाबत विचार करेन, असं राज ठाकरे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंनी सामना सुरू केला होता, तेव्हा त्याचा खप साडेतीन चार लाख एवढा होता. आता तो काही लोकांकडेच जातो. तेव्हा त्याचा प्रचंड खप होता.
आज मार्मिक किती लोक वाचतात? कोणीही नाही, कारण त्यात बाळासाहेब नाहीत. तशीच अवस्था या शिवसेनेची झाली आहे. नशिबाला जर कोणी यश म्हणत असेल तर त्याचा ऱ्हास सुरू होतो. राज ठाकरे उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना म्हणाले की, तो माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही. ते बोलतात वेगळं आणि करतात वेगळं.
उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करणार का? असं विचारलं असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना भेटायला गेलो होतो. हा भावना आणि आजारपणाचा विषय म्हणून ठीक आहे, पण त्यांच्यावर विश्वास ठेऊ शकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
त्यांनी अनेक विषयांवर आपले रोखठोक मत बोलून दाखवले. २०१४ ला आणि २०१७ ला अशा दोन वेळेला निवडणुकांच्या वेळी शिवसेना मनसेशी युती करणार अशी चर्चा होती. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं. विश्वास ठेवण्यासारखं नाहीये काही, मला बाकीच्यांचं वाईट वाटतं, हा माणूस विश्वास ठेवण्यासारखं नाही.
बाळासाहेबांच्या दादू हॉस्पिटलमध्ये असल्याचा फोन केला होता, तेव्हा मी धावत भेटायला गेलो होतो. तो भावना आणि आजारपणाचा विषय ठीक आहे. परंतु मला माहिती आहे तो अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहिती नाही, इतक्या जवळून मला माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या
aditya thackeray: आदित्य ठाकरेंनी घातला शिवसैनिकांच्या काळजाला हात, बंडखोरांवर हल्लाबोल करत म्हणाले…
भाजप विरूद्ध शिंदे गटात जुंपली; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला शिंदे गटाकडून जोरदार प्रत्यूत्तर
Raj thackeray: तो माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही, बोलतो वेगळं करतो वेगळं, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Tirupati balaji: शिवरायांची मुर्ती पाहताच तिरूपती बालाजी मंदिरात जाण्यास केली मनाई; व्हायरल व्हिडीओ पाहून संतापले लोकं