raj thackeray on jain mandir | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अनेकदा राज्यातील आणि देशातील वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य करताना दिसून येत असतात. अनेकदा ते राज्य सरकारला वेगवेगळ्या मुद्यांवरुन पत्रही पाठवत असतात. अशात राज ठाकरे यांनी झारखंडच्या राज्य सरकारला एक निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.
झारखंडमध्ये गिरीहीद जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामध्ये सम्मेद शिखरस्थळ हे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्याचा निर्णय झारखंड सरकारने घेतला आहे. पण या निर्णयाला जैन धर्मीय लोक विरोध करत आहे. त्यासाठी ते देशभरात आंदोलनेही करत आहे.
या संदर्भात काही नेतेही आपली भूमिका मांडताना दिसून येत आहे. असे असतानाच आता राज ठाकरे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. झारखंड सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जैन समुदायाला आपला पुर्णपणे पाठिंबा असून झारखंड सरकारने सम्मेद शिखरस्थळाला पर्यटनस्थळ घोषित करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.
झारखंडमधल्या गिरीहीद जिल्ह्यातलं 'सम्मेद शिखरस्थळ' हे जैन धर्मियांचं पवित्रस्थळ आहे. ह्या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नये, कारण एकदा का ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित झालं की तिथे जैन धर्माला मान्य नसलेल्या अनेक गोष्टी घडू शकतील अशी जैन बांधवांची भावना आहे. १-१
— Raj Thackeray (@RajThackeray) January 5, 2023
राज ठाकरेंची पोस्ट-
झारखंडमधल्या गिरीहीद जिल्ह्यातलं ‘सम्मेद शिखरस्थळ’ हे जैन धर्मियांचं पवित्रस्थळ आहे. ह्या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नये, कारण एकदा का ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित झालं की तिथे जैन धर्माला मान्य नसलेल्या अनेक गोष्टी घडू शकतील अशी जैन बांधवांची भावना आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जैन बांधवांच्या मागणीशी पूर्ण सहमत आहे. झारखंड सरकारने जैन धर्मियांच्या तीव्र भावनांचा विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, आणि हे होत नसेल तर केंद्र सरकारने ह्यात त्वरित हालचाल करावी.
महत्वाच्या बातम्या-
Sachin kumavat : अहिराणी गाण्यांनी गाजवला सोशल मिडीया, बॉलिवूडलाही टाकलं मागे, कोटींच्या घरात व्ह्युज
Team india : दुसऱ्या सामन्यात संजूच्या जागी ‘या’ खेळाडूची होणार ग्रॅन्ड एन्ट्री, होणार तीन मोठे बदल
वेड चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून जेनेलिया भावूक, म्हणाली, टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही..