मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. राज ठाकरेंनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे रात्रीपासून राज्यभरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे. तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.
तर आता पुन्हा एकदा थेट पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मशिदींवरील भोंग्यांचा विषय एका दिवसाचा नाही. याला धार्मिक रंग देऊ नका. भोंगे उतरवत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असे पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
यामुळे आता ही प्रकरण आणखीच चिघळणार असल्याच बोललं जातं आहे. पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना राज ठाकरे म्हणाले, “जोपर्यंत विषय निकाली लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार,” असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. ‘राज्यात दंगली व्हाव्यात ही आमची मुळीच इच्छा नाही, तसे होऊही नये, असे राज ठाकरे म्हणाले.
‘भोंगे खाली उतरलेच पाहिजे. कुणाच्याही प्रार्थनेवर आक्षेप नाही. ज्याने त्याने आपली प्रार्थना आपल्या घरातच म्हणावी. त्याचा कुणालाही त्रास होता कामा नये,’ असे पुढे बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. ‘दिवसभर जी काही चार-पाच वेळा बांग दिली जाते त्यांची प्रार्थना म्हणतात ती जर परत त्यांनी दिली तर आमची लोकं त्या त्या वेळा हनुमान चालीसा वाजवणार म्हणजे वाजवणार, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन तुम्हाला करायचं असेल तर त्यांनी दिलेल्या डेसिबलचं पालन करावं लागेल. लोकवस्तीमध्ये ४५ ते ५५ डेसिबलपर्यंत स्पीकर लावू शकता. आम्हाला सणांसाठी दिवस बघून परवानगी देता आणि यांना ३६५ दिवस परवानगी देता ती कशासाठी? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
‘नागरिकांचा होणारा त्रास कमी झाला पाहिजे, हीच मुख्य अपेक्षा आहे. केवळ मशिंदींवरील नाही, तर मंदिरांवरील भोंग्यांवरही कारवाई करावी, असे राज म्हणेल. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्ते सक्रीय झाले असून, मुंबईसह काही ठिकाणी अजानावेळी हनुमान चालीसा लावण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या हस्ते प्राजक्ता माळीला मिळाला ‘हा’ पुरस्कार; पोस्ट शेअर करत म्हणाली,…
वसंत मोरे मनसेला ठोकणार रामराम? ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण
Virajas Kulkarni & Shivani Rangole : अखेर विराजस आणि शिवानी अडकले लग्नबंधनात; पहा लग्नसोहळ्याचे खास फोटो
‘तात्या, काहीतरी चुकतंय, राजसाहेबांची साथ सोडू नका, ‘ सोशल मिडियावर वसंत मोरेंच्या ‘त्या’ फोटोवर कमेंट्सचा पाऊस