raj thackeray make plan for election | मुंबई महापालिकेच्या निवडणूका लवकरच होणार आहे. पण अद्याप त्याची तारीख जाहीर केलेली नाही. काही पक्ष सुद्धा या निवडणूकीच्या तयारीला लागले आहे. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पदाधिऱ्यांची बैठक घेतली आहे.
राज ठाकरे यांनी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेतली आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहे. स्वबळावर लढण्याची तयारी करा. मनसेकडे लोक पर्याय म्हणून पाहत आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच सहा एमवर लक्ष केंद्रीत करा असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
या बैठकीत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी तुम्हाला सत्तेच्या खुर्चीवर बसवणार आहे. स्वत: सत्तेच्या खुर्चीवर उडी मारुन बसणार नाही. आपल्यापैकी एक सत्तेत असेल. आताच्या राजकारणाला लोक कंटाळली आहे. त्यामुळे आपले विचार सकारात्मक ठेवा. ते तुम्ही लोकांपर्यंत सुद्धा पोहचवा.
तसेच यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना ६ एमचा फॉर्म्युला पण दिला आहे. सर्व कार्यकर्त्यांना त्या सहा एमवर लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. सहा एम म्हणजे मेसेज, मेसेंजर, मनी, मसल, माईंड आणि मॅकेनिक. या सहा एमवर लक्ष देऊन काम करण्याचे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले आहे.
मॅकेनिक म्हणजे तंत्राचा वापर करा. मेसेंजर म्हणजे आपले विचार मेसेंजरच्या माध्यमातून लोकापर्यंत पोहचवा.मसल म्हणजे आपल्या ताकदीने शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहचा आणि माईंड म्हणजे आपले विचार त्यांना सांगा. मनी म्हणजे पैसा लागेल तो आपण उभा करु. त्यानंतर आपण निवडणूक जिंकू, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
तसेच शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याबद्दलही राज ठाकरेंनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, दसरा मेळाव्यात फक्त चिखलफेक सुरु होती. याठिकाणी कुठलेही विचार मांडले नाहीत. त्यामुळे मनसेचे जे विचार मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी आहेत, ते लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. सहानुभूती मिळत नाही. त्यामुळे सकारात्मक विचार लोकांपर्यंत मांडा.
महत्वाच्या बातम्या-
China: १९६७ मध्ये भारताने चीनला चारली होती धुळ, ३ किलोमीटर मागे पळून गेली होती चिनी सेना
Sharad Pawar : चिन्ह गेल्याने शिवसेनेला फरक पडणार नाही, उलट उद्धव ठाकरे आणखी भक्कम होतील; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास
Tatya Tope: नाना साहेबांचे मित्र आणि सेनाप्रमुख होते तात्या टोपे, त्यांच्या डोक्यावर होते हजारोंचे बक्षीस, वाचा त्यांच्याबद्दल..