महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त एक भाषण दिले होते. त्या भाषणात त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. तसेच मशिदींवरील भोंगे राज्य सरकारने तातडीने हटवावे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती. (raj thackeray look in hanuman jayanti)
मशिदींवरील भोंगे खाली घ्या, नाहीतर दुप्पट आवाजात लाऊडस्पीकर लावून हनूमान चालिसा वाजवू, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे राज्याचे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर काहींनी टीका केली, तर काहींनी याला समर्थन केले आहे.
ज्या नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती, त्यांच्यासाठी राज ठाकरेंनी एक उत्तर सभा घेतली होती. त्या उत्तर सभेत त्यांनी नेत्यांवर जोरदार टीका केली होती. अशात हनूमान जयंती निमित्त राज ठाकरे पुण्यात आले होते. यावेळी महाआरती आणि हनूमान चालिसाचे पठण करण्यात आले.
शनिवारी सगळीकडे उत्साहात हनूमान जयंती साजरी करण्यात आली. राज ठाकरेंनीही पुण्यात मनसैनिकांच्या उपस्थितीत महाआरती केली. त्यावेळी राज ठाकरेंचा उल्लेख हिंदूजननायक म्हणून करण्यात आला. महाराआरतीच्या वेळी राज ठाकरेंचं जे रुप पाहायला मिळालं ते राजकीय वाटचाल स्पष्ट करणारं होतं.
मंदिरात पोहचल्यानंतर राज ठाकरेंच्या खांद्यावर भगवी शाल देण्यात आली. त्यावेळी मनसैनिकांकडून राज ठाकरेंना गदाही देण्यात आली. मंदिरात देण्यात आलेलं आरतीचं ताट हातात घेत राज ठाकरेंनी हनूमानाची सगळ्यांसोबत आरतीही केली. त्यांचे हे रुप पाहून मनसे हिंदूत्वाच्या मुद्यावरुनच राज्यात राजकारण करणार हे स्पष्ट झालं आहे.
तसेच राज ठाकरेंचे हे रुप शिवसेनेच्या मनात धडकी भरवणारं ठरेल, अशीही चर्चा आता राजकारणात सुरु झाली. शनिवारी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हनूमान जयंतीची महाआरती पार पडली. यावेळी हजारो मनसैनिक या आरतीला उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
भगवंत मान यांच्यावर गंभीर आरोप, नशेच्या अवस्थेत गुरूद्वारात केला प्रवेश, वैद्यकीय तपासणीची होतेय मागणी
..जेव्हा भगतसिंगची आई मनोज कुमार यांना म्हणाली, ‘तु माझ्या मुलासारखा दिसतोस’, वाचा अविस्मरणीय किस्सा
सावधान! ‘या’ पदार्थाच्या सेवनाने गळतात केस, पुरूष-महिलांनी पाळावा डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला