Share

मुख्यमंत्री होणारे फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने राज ठाकरेंनी लिहिलं पत्र; म्हणाले, ही बढती आहे की…

काही दिवसांपासून राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. एकनाथ शिंदे काही दिवसांपासून आसामच्या गुवाहटीत होते. पण आता ते मुंबईत आहे. गुरुवारी त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. (raj thackeray letter to devendra fadanvis)

देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन ही मोठी घोषणा केली होते. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आहे. त्यांचा दोघांचाही शपथविधी पार पडला आहे. पण सगळ्यात हैराण करणारी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं उपमुख्यमंत्री होणं.

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राजकीय नेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

प्रिय देवेंद्रजी,
सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो…

तुम्ही ह्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत.

पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरच अभिनंदन!

https://twitter.com/RajThackeray/status/1542814470741069824

आता जरा आपल्यासाठी.
ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे.

एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिध्द केलेलंच आहे. त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुमचं मनःपूर्वक अभिनंदन!

महत्वाच्या बातम्या-
मातोश्रीला कधी भेट देणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगीतली वेळ…
उदयपूरमधील हिंदू युवकाच्या हत्येला सर्वस्वी भाजपची नुपूर शर्मा जबाबदार – सर्वोच्च न्यायालयाने झापले
बातमी विद्यार्थ्यांसाठी! बारावीनंतर ‘हे’ कोर्सेस करा, नोकरीची १०० टक्के खात्री

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now