Share

‘अरे मला जगू द्याल की नाही’ म्हणत राज ठाकरे पत्रकारांवर भडकले; जाणून घ्या नेमकं काय घडलं

१. ‘अरे जगू द्याल की नाही’; राज ठाकरे पत्रकारांवर भडकले

२. ‘ऐ लाईट बंद करा रे, काही जगू द्याल की नाही’; राज ठाकरे पत्रकारांवर संतापले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे संघटनबांधणीसाठी आणि पुणे महानगरपालिका निवडणूकीची रणनिती आखण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी राज ठाकरे हे पुण्याच्या बाजीराव रस्त्यावर पुस्तकं खरेदी करण्यासाठी आले असता त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, यावर नाराज झालेल्या राज ठाकरेंनी ‘मला जगू द्याल की नाही’,असं म्हणत पत्रकारांना चांगलंच झापल्याचं पाहायला मिळालं.

मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे हे रात्री आठ वाजता पुण्यातील प्रसिद्ध बाजीराव रस्त्यावर अक्षरधारा बुक गॅलरीत पुस्तकं खरेदी करण्यासाठी आले होते, त्यावेळी राज ठाकरे तिथं येणार म्हणून विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तिथं गर्दी केली होती.

राज ठाकरे आल्यानंतर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी ‘ऐ लाईट बंद करा रे, काही जगू द्याल की नाही’ अशा शब्दांत पत्रकारांना फैलावर घेतलं. यावेळी राज ठाकरेंनी अक्षरधारा बुक गॅलरीतून ५० हजार रुपयांची १५० पुस्तकं खरेदी केल्याची माहिती आहे.

https://twitter.com/i_am_Ravindra1/status/1526614195948531712

याशिवाय ठाणे, दादर, औरंगाबादच्या वादग्रस्त सभानंतर आता राज ठाकरे हे पुण्यात जाहिर सभा घेणार असल्याची माहिती शहरातील मनसे नेत्यांनी दिली आहे. या सभांची डेट फिक्स नसली तरी मनसैनिकांना या सभेची फार उत्सुकता लागलेली आहे. याशिवाय आता राज ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देणार का, याकडंही सर्वांचं लक्ष असणार आहे.

परंतु राज ठाकरे आणि तिथं उपस्थित असलेल्या काही पत्रकारांमधला हा संवाद कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काही मिनिटांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्यानं विविध लोकांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर काही लोकांनी राज ठाकरेंनाही वैयक्तिक आयुष्य आहे आणि त्याचा आदर करायला हवा, असं सांगितलं तर काही लोकांना राज ठाकरेंनी पत्रकारांशी नम्रपणे वागण्याची गरज आहे, असंही सांगितलं.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी जाहिर राजकीय भूमिका घेतली होती. त्यासाठी त्यांनी महाविकास आघाडी सरकार काही दिवसांचा अल्टिमेटमही दिला होता. याशिवाय ईदनंतर मनसेच्या काही नेत्यांनी मुंबई आणि ठाण्यातल्या काही मशिदींबाहेर भोंगे लावत हनुमान चालिसेचं पठण केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली होती.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now