raj thackeray : आज पुण्यात तणावपूर्ण वातावरण आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे सध्या देशभरात चांगलीच चर्चेत आली आहे. दहशतवादाला मदत केल्याप्रकरणी एनआयएनं पीएफआयच्या देशभरातील कार्यालयांवर छापे टाकून शंभराहून अधिक लोकांना अटक केली आहे.
काल पीएफआयवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ पुण्यातील मुस्लीम समाजातील काही तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या.घोषणा दिल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या ६० ते ७० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
यावरून आता राजकारण चांगलच तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत या प्रकरणाविरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच राज ठाकरेंनी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती एक विनंती देखील केली आहे. यामुळे आणखीनच वातावरण तापलं आहे.
माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर… आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे. @AmitShah @Dev_Fadnavis pic.twitter.com/BB88mEZ8hr
— Raj Thackeray (@RajThackeray) September 24, 2022
आपल्या ट्विटमध्ये राज ठाकरेंनी म्हंटलं आहे की, ‘या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की, यापुढे पाण्यासाठी देखील ( पा ) उच्चारता येणार नाही, नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत, असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
पुढे राज ठाकरे म्हणतात की, ‘संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. देशद्रोह्यांचं समर्थन करत जर ह्या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या, आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत.’
दरम्यान, हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका, असं राज ठाकरे स्पष्टच बोलले आहे. सध्या राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
Bank : बँकांची कामे आत्ताच करून घ्या; ऑक्टोबर महिन्यात बँकांना आहेत ‘या’ २१ सुट्ट्या