Share

‘तात्या, काहीतरी चुकतंय, राजसाहेबांची साथ सोडू नका, ‘ सोशल मिडियावर वसंत मोरेंच्या ‘त्या’ फोटोवर कमेंट्सचा पाऊस

vasant-more

गुढीपाडव्याच्या सभेपासूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच चर्चेत आहेत. तर दुसरीकडे मनसेच्या आणखी एका नेत्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मनसे नेते वसंत मोरे असे या व्यक्तीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी वसंत मोरेंनी राज ठाकरेंच्या भोंग्यांविषयीच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

तर आता मनसेच्या भोंग्यांविरोधातील आंदोलनात वसंत मोरे कुठेच सक्रिय असल्याचे दिसत नाहीयेत. याचबरोबर मंगळवारपासून वसंत मोरे नॉटरिचेबल असल्याच्या चर्चांना देखील उधाण आले आहे. यामुळे नक्की वसंत मोरेंच नेमकं चाललंय काय? मोरे अजूनही पक्षावर नाराज आहेत का? असे सवाल उपस्थित होतं आहेत.

अशातच मोरे यांनी एक फोटो शेअर केला आहे, त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतानाचा फोटो शेअर केला आहे. मोरे यांची ही पोस्ट सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतं असून पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

https://www.facebook.com/vasantmore88/posts/pfbid0zUuWbHEQ1uuddjHbyBffsvULoCbrsZFRFQFQbiKDDMC2mcKtv7Kj8cTqrdWmEeZhl

वाचा काय लिहिलं आहे वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये? मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतानाचा फोटो शेअर करताना “निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू ” श्रीमंतयोगी” असं कॅप्शन दिलं आहे. यामुळे मोरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

दरम्यान, अनेकांनी मोरे यांच्या पोस्टवर कमेंट केली आहे. मात्र या कमेंट्समधून अनेकजण मोरेंवर नाराज असल्याचं दिसत आहे. मोरे लवकरच मनसे सोडचिठ्ठी देणार असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. ‘तात्या, काहीतरी चुकतंय, राजसाहेबांची साथ सोडू नका, जे कराल ते पक्षाच्या हिताचे असावे,’ अशा देखील कमेंट्स आल्या आहेत.

तसेच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेला वसंत मोरे यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर पक्षाने थेट मोरे यांची मनसे शहराध्यक्ष पद काढून घेतले. त्यानंतर मोरेंनी राज यांची भेट घेतली. त्यानंतर मोरेंची नाराजी दूर झाल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या
२८ वर्षीय तरुणीचा ६६ वर्षीय ‘या’ भारतीय क्रिकेटवर जीव कसा जडला? भन्नाट आहे लव्हस्टोरी
राजसाहेब..! अटक झालेल्या तरुणांच्या भवितव्याचं काय होणार? सोशल मिडियावर राज ठाकरे ट्रोल
मनसैनिकांनी केले राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन, राज्यात ठिकठिकाणी पहाटे हनुमान चालिसाचे पठण
वातावरण बिघडवणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, औरंगाबादमध्ये ४८ मशिदींबाहेर कडक बंदोबस्त

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now