आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. यामुळे आता राज्य सरकार कोणती पाऊले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही,त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं, अशी ठाम भूमिका राज ठाकरेंनी पुन्हा मांडली.
तसेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. “राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांवरून आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे,” असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.
ते ठाण्यातील उत्तरसभेत बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो,त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवले पाहिजे,आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही,त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं.’
पुढे ते म्हणाले, ‘मी चुकीचं काय बोललो?मशिदींवरच्या भोंग्यांचा आख्ख्या देशाला त्रास होतोय. यात धार्मिक विषय कुठंय? तुम्हाला जी आजान द्यायचीये, ती घरात द्या,रस्ते, फुटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे. आम्हाला का ऐकवताय?, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
तसेच सांगून तुम्हाला समजत नसेल, तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार, असे राज ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो,त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
‘आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही,त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं, अशी ठाम भूमिका राज ठाकरेंनी पुन्हा मांडली. पुढे राज ठाकरे म्हणाले. ‘३ तारखेला ईद आहे,माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की कुठलीही तेढ, दंगल निर्माण करायची नाही,महाराष्ट्राचं स्वास्थ्य आम्हाला बिघडवायचं नाही.’
‘आज १२ तारीख आहे,१२ एप्रिल ते ३ मे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींमधल्या मौलवींशी तुम्ही बोला, त्यांना सांगा, सगळे लाऊडस्पीकर खाली उतरवले पाहिजेत, ३ तारखेनंतर तुम्हाला आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही, असे राज यावेळी बोलताना म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
कार घ्यायला पैसै नव्हते म्हणून राखी झाली होती उदास, ‘या’ व्यक्तीने गिफ्ट केली नवीकोरी BMW
पांढरी साडी नेसलेल्या ऐश्वर्याने जेव्हा भर सभेत केली होती सासूची मदत, लोकं म्हणाले, बेस्ट ‘सासू-सुन’
एकेकाळी जेवण करायला नव्हते पैसै आणि राहायला नव्हते घर, आज करोडोंचा मालक आहे ऋषभ पंत
काश्मिर फाईल्सचे कौतुक केल्यानंतर शरद पवारांनी मारली पलटी, विवेक अग्निहोत्री म्हणाले, विमानात काय झालं होतं?