राज्यात सध्या भोंग्यांच्या मुद्यावरुन वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी औरंगाबादमध्ये, ठाण्यात आणि गुढीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत मशिदींवरील भोंग्यांवर आक्रमक भूमिका घेतली होती. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलं.
तर आता थेट राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकीदेण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल, असं मनसे नेत्यांनी म्हंटलं आहे.
तर जाणून घ्या सविस्तर पत्रात काय म्हंटलं आहे…? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मला जीवे मारण्याच्या धमकीचं एक पत्र माझ्या लालबागच्या पक्ष कार्यालयात आलं असल्याची माहिती देखील त्यांनी आहे.
याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. धमकीच्या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आले असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. राज्य आणि केंद्र सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल असा गर्भित इशारा दिला आहे.
दरम्यान, याबाबत बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, ‘मी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मी राज ठाकरेंना ते पत्र दाखवलं व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून संबंधित पत्र त्यांच्याकडे दिलं आहे. आता ते याबाबत चौकशी करतील.’
याचबरोबर ‘मला दिलेली धमकी एक वेळ ठीक. पण राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटून उठेल हे राज्य सरकारनं लक्षात ठेवावं”, असं बाळा नांदगावकर म्हणाले. सध्या या धमकीच्या पत्रावरून राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र अद्याप यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया आलेली नाहीये.
महत्त्वाच्या बातम्या
‘तो’ फोटो शेअर करत केदार शिंदेंनी राज ठाकरेंंचे केले कौतुक, म्हणाले, ‘एक अव्वल कलाकार’
आता कॉलेज डिग्री नसली तरी मिळणार ३० हजार पगार, सरकारने केली मोठी घोषणा
निलेश राणेंचा थेट पवारांवर हल्लाबोल; ‘५० वर्ष आमदार, एवढ्या वर्षात काय केलं?’
पैशांचं पॉकेट मागच्या खिशात ठेवताय? तुम्हाला होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार, तज्ञांनीच केलाय दावा