अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेला परवानगी मिळाली आहे. या सभेला परवानगी मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झालेला होता. पण आता पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र सभेसाठी काही अटी पोलिसांनी दिल्या आहेत.महाराष्ट्र दिनी होणाऱ्या या राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी १६ अटी घातल्या आहे.
या अटींची अंमलबजावणी आणि जातीय तेढ निर्माण होण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेले आहे. औरंगाबादेत होणाऱ्या सभेआधी राज ठाकरे पुण्यात पोहोचले आहेत. काल राज ठाकरे पुण्यातच मुक्काम ठोकला. अशातच एक वेगळी बातमी समोर येत आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल राज ठाकरेंच्या गाडीवर हजारोंचा दंड लावण्यात आला आहे. आज राज ठाकरे यांनी वापरलेल्या गाडीवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 7900 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड आकारण्यात आला आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाहन चालकांनी ही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे यापूर्वी उघडकीस आले होते. या यादीत आता राज ठाकरेंच्या नावाची भर पडली आहे.
अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे दंड भरला आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अजित पवारांनी 27 हजारांचा दंड भरला आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाहनावर 14 हजार 200 इतका दंड आहे.
तर दुसरीकडे, राज ठाकरे आज सकाळी साडेआठच्या सुमारास औरंगबादच्या दिशेने रवाना होणार आहेत. पण औरंगाबादेला जाताना ते रस्त्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेणार आहेत. मनसेचे पुणे शहर अध्यक्ष आणि माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांनी राज ठाकरेंच्या उद्याच्या कार्यक्रमासंबंधित माहिती दिली आहे.
पुण्यातून बाहेर पडताना राज ठाकरेंचा ताफा वढू-तुळापूर येथील संभाजी महाराजांच्या समाधीला स्थळाला भेट देणार आहे. या ठिकाणी राज ठाकरे दर्शन घेणा असून पुढील प्रवासासाठी निघतील असं बाबर यांनी सांगितलं आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आशीर्वाद देण्यासाठी १०० ते १५० ब्राम्हण ‘राजमहाल’ या ठिकाणी येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
वसंत मोरेंनी मनसे सोडली? राज ठाकरेंच्या दौऱ्यात अनुपस्थित राहीलेल्याने चर्चांना उधान
‘घरचं नको, तुरुंगातलेच पौष्टिक जेवण खा,’ राणा दाम्पत्याला कोर्टाने झापले
हिंदी भाषेवरील वादावर कंगणाचे रोखठोक मत; म्हणाली संस्कृतच हवी राष्ट्रभाषा; कारण…
बाबरी मशीद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? उद्धव ठाकरेंनी थेट नाव घेऊन सोडला बाण