Raj thackeray critisizes uddhav thackeray | नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झी २४ तास वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. राज ठाकरे उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना म्हणाले की, तो माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही. ते बोलतात वेगळं आणि करतात वेगळं.
उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करणार का? असं विचारलं असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना भेटायला गेलो होतो. हा भावना आणि आजारपणाचा विषय म्हणून ठीक आहे, पण त्यांच्यावर विश्वास ठेऊ शकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
त्यांनी अनेक विषयांवर आपले रोखठोक मत बोलून दाखवले. २०१४ ला आणि २०१७ ला अशा दोन वेळेला निवडणुकांच्या वेळी शिवसेना मनसेशी युती करणार अशी चर्चा होती. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं. विश्वास ठेवण्यासारखं नाहीये काही, मला बाकीच्यांचं वाईट वाटतं, हा माणूस विश्वास ठेवण्यासारखं नाही.
बाळासाहेबांच्या दादू हॉस्पिटलमध्ये असल्याचा फोन केला होता, तेव्हा मी धावत भेटायला गेलो होतो. तो भावना आणि आजारपणाचा विषय ठीक आहे. परंतु मला माहिती आहे तो अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहिती नाही, इतक्या जवळून मला माहिती आहे.
अमित शाह यांनी मातोश्रीवरील चार भिंतीत मुख्यमंत्रिपदाबाबत अडीच-अडीच वर्षांचं कमिटमेंट दिल्याचं तुम्ही सांगता, पण पंतप्रधान मोदी यांनी जाहीर भाषण केलं होतं तेव्हा उद्धव ठाकरेही मंचावर उपस्थित होते. या निवडणुकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार असं मोदी म्हणाले होते.
अमित शहांचही भाषण आहे, मग त्यावर तुम्ही आक्षेप का घेतला नाही? निकाल लागल्यावर यांना साक्षात्कार झाला, असा सवाल करत त्यांनी टोला लगावला आहे. राज ठाकरेंनी एक किस्साही सांगितला. ते म्हणाले की, माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी मी त्यांना म्हटलं, की उगाच आजच्या परिस्थितीचं फुकटचं श्रेय घेऊ नका.
असं त्यांना मी म्हणताच ते मोठ्याने हसायला लागले. मी त्यांना पुढं म्हणलं की, जी गोष्ट घडलेली आहे, ती गोष्ट ना तुम्ही घडवली, ती गोष्ट ना अमित शहांनी घडवली ना भाजपने घडवली, ना अजून कोणी घडवली, याचं श्रेय उद्धव ठाकरेंनाच द्यावं लागेल, असं राज ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
रणवीर सिंगने न्युड फोटोशुट करून धुमाकूळ घातल्यानंतर दीपिकाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…
पती अजय देवगणला बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड भेटल्यानंतर काजोल भावूक, म्हणाली, अभिमानाने…
प्रथमच भारतीय क्रिकेटपटूला मिळाला विदेशात असा सन्मान, ‘या’ स्टेडियमला देणार गावसकरांचे नाव
“उद्धव ठाकरे सोबत हवे आहेत, म्हणून एकनाथ शिंदे अक्षरशः ढसाढसा रडले”