Raj Thackeray : राज्यातील उलथापालथीनंतर आता सर्वांचे लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवणुकीकडे लागले आहे. आगामी काळात मुंबई महापालिका निवडणूका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये बाजी मारण्यासाठी सर्वांनी कंबर कसली आहे.
तसेच गेल्या काही दिवसांत भाजप आणि मनसेच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे भाजप आणि मनसेची युती होणार का? तसेच महापालिका निवडणुका भाजप मनसे एकत्र लढवतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आता शिंदे गट आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत. याबाबत मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (१२ सप्टेंबर) एक महत्वाची बैठक बोलावली आहे. मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांची ही बैठक आहे.
वांद्रे येथील एमआयजी क्लब याठिकाणी ही बैठक पार पडणार आहे. आता राज ठाकरे या बैठकीत नेमके काय बोलतात व उपस्थितांना काय सूचना देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे गट आणि मनसे यांची युती होण्याच्या चर्चा रंगल्या असताना ही बैठक आयोजित केल्याने यामध्ये नेमके काय घडते याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १८ सप्टेंबरपासून विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच मनगरपालिका निवणुकाही होऊ घातल्या आहेत. त्यामुळे या बैठकीत संघटनात्मक बांधणी आणि महानगरपालिकेच्या निवडणूका याबाबत चर्चा रंगणार असल्याचे बोलले जात आहे.
राज ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेनंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर ते पुन्हा एकदा ॲक्टिव्ह मोडमध्ये दिसत आहेत. मनसे आणि शिंदे गटाची युती झाली तर येत्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये कोण बाजी मारतो? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
ट्रॅफीकमध्ये अडकला डॉक्टर; आॅपरेशन थिएटरमधील रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी जे केलं ते पाहून तुम्हीही रडाल
Garba : आता गरब्याच्या ठिकाणी बिगरहिंदूंना प्रवेश नाही; लव्ह जिहाद थांबवण्यासाठी मोठा निर्णय
उद्योगमंत्री उदय सामंतांना जाळून टाकणार; जाहीर धमकीने राजकीय वर्तूळात खळबळ
दाभोळकर हत्या तपासाबाबत कुटुंबीयांचे गंभीर आरोप, पोलिसांची पोलखोल करत केला ‘हा’ दावा