अखेर चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला आहे. काही कारणास्तव राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलंय की, ‘तूर्तास अयोध्या दौरा स्थगित, महाराष्ट्र सैनिकांनो या.. यावर सविस्तर बोलू,’ असं ट्विट सध्या राज ठाकरेंनी केलं आहे.
दरम्यान, पुण्यातील रविवारच्या सभेत आयोध्या दौऱ्यावर राज ठाकरे काय स्पष्टीकरण देणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ‘राज साहेब अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली. तसेच माफी न मागितल्यास उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही, अशी धमकी भाजप खा. ब्रिजभूषण सिंह यांनी दिली होती. अखेर राज यांनी दौरा स्थगित केला आहे.
यावरुन आता आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहे. याचाच धागा पकडत शिवसेना खासदार संजय राऊतांनी “अयोध्या दौऱ्यासाठी त्यांनी मदत मागितली असती, तर आम्ही सहकार्य केलं असतं”, असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. यावर आता मनसेने सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे.
मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी फेसबुक पोस्ट लिहून शिवसेनेला खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. “जो नेता राष्ट्रहितासाठी पंतप्रधानांवर टीका करताना कचरत नाही, तो नेता एका खासदाराच्या बडबडण्याने आपला निर्णय बदलेल का? असा संतप्त सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
पुढे फेसबुक पोस्टमध्ये शिंदे म्हणतात, ‘तूर्तास स्थगितचा अर्थ पुढे होईल असा आहे. मीडिया आणि विरोधकांनी तूर्तास स्थगितचा अर्थ लावताना नवनवीन राजकीय शोध लावू नयेत. सर्वांचा चोख हिशोब केला जाईल, पुण्यात!” अशी पोस्ट किर्तीकुमार शिंदे यांनी केली आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 22 मे रोजी पुण्यात जाहीर सभा होणार आहे. मात्र, त्यापूर्वी मनसेला जबर धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. मनसे नेते वसंत मोरेंच्या कट्टर कार्यकर्त्याने पक्षाला रामराम ठोकला आहे. पुण्यातील मनसेचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष आणि वसंत मोरेंच्या कट्टर कार्यकर्ता अशी ओळख असलेले निलेश माझीरे मनसे सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ते मनसेतून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यांनी शिवसेनेचे संपर्कनेते सचिन अहिर यांची देखील भेट घेतली आहे. तसेच येत्या दोन दिवसांत माझीरे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पक्षातील अंतर्गत वाद आणि गटबाजी यामुळे निलेश माझीरे पक्षाला रामराम ठोकणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
भाजपचा बडा नेता अडचणीत; मयताजवळ आढळलेल्या चिठ्ठीतून झाला खळबळजनक खुलासा
घोर कलियुग! मुलाने आईसोबतच केले लग्न, घडलेल्या घटनेमुळे वडिलांनाही बसला धक्का
प्लिज मला जाऊद्या… हातापाया पडत बिचारी तरूणी विनवणी करत होती, मात्र क्रुर गावकऱ्यांनी तिला….
संभाजीराजेंना शिवसेनेकडून राज्यसभेची ऑफर, पण ‘या’ अटी; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय घडलं? वाचा…