Share

एकाचा विरोध तर एकाचा पाठिंबा! राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी भाजप खासदाराची जय्यत तयारी

भोंगा प्रकरणानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना एक गर्भित इशारा दिला. ‘राज साहेब अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली. तसेच माफी न मागितल्यास उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली.

काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अयोध्या दौऱ्याबाबत भाष्य केलं. ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्यानंतर राजकारण चांगलेच रंगलेलं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे राज यांनी अयोध्या दौऱ्याबाबत केलेल्या घोषणेनंतर मनसैनिक तयारीला लागले आहेत.

भाजप खासदाराने दिलेल्या धमकी नंतर आता राज ठाकरेंचा दौरा चर्चेत आला आहे. मात्र दुसरीकडे एका भाजप खासदाराने राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे भाजपात दोन गट पडलेले पाहायला मिळत आहे. एकीकडे विरोध असताना मात्र दुसरीकडे भाजप खासदाराने पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

राज ठाकरेंच्या अयोद्या दौऱ्याचं स्वागत भाजपचे खासदार लल्लू सिंह यांनी केलं आहे. जो कुणी श्री रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत येईल त्याचं स्वागत आहे. हनुमानजींच्या कृपेने जर कुणी अयोध्येत श्री रामाच्या चरणी येत असेल तर त्याचं स्वागतच आहे, असं त्यांनी म्हंटलं आहे.

ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. पुढे बोलताना खासदार लल्लू सिंह यांनी म्हंटलं आहे की, ‘प्रभू श्रीरामाकडे प्रार्थना आहे की राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचं कल्याण करण्यासाठी युक्ती देवो.’ यामुळे आता राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील नंदिनी नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना महंतांनी राज ठाकरे यांना एका आठवड्यात माफी मागा, अन्यथा ‘छटी का दुध याद दिलाएंगे’ असा थेट इशारा दिला आहे. नंदिनी नगर येथे आयोजित सभेत महंतांनी राज ठाकरे यांना लक्ष केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
सिद्धार्थ नाही तर एक व्हिलन रिटर्न्समध्ये दिसणार ‘हा’ अभिनेता, प्रेक्षकांना करावी लागणार प्रतीक्षा
३०० महिलांसोबत बनवायचे संबंध, ‘अशा’ पद्धतीने निवडायचे रात्रीची राणी; वाचा कोण होते भूपिंदर सिंग…
410 किमी उलटं पायी चालत आला होता अमिताभचा हा फॅन, जया बच्चनने बांधली होती त्याला राखी
संगीत क्षेत्रातून आणखी एक दुःख बातमी; प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा याचं निधन

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now