Share

भोंग्याच्या मुद्द्यावर राज ठाकरे बोलत असतानाच अजान झाली सुरू, भडकलेले राज म्हणाले, “आत्ताच्या आत्ता…”

मशिदींवरील भोंग्यावरून सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. काही दिवसांपूर्वी मशिदींवरील भोंग्याचा विषय मनसे अध्यक्ष राज यांनी उचलून धरला होता. त्यावरुन, गेल्या 10 दिवसांपासून राज ठाकरेंवर टिका करणाऱ्यांना काय प्रत्युत्तर मिळणार? राज ठाकरे काय बोलणार? याकडे राज्याचे लक्ष लागले होते.

‘लाऊडस्पीकर हा काही नवीन विषय नाही. याआधी अनेकांनी हा विषय मांडला आहे आणि मी फक्त त्याला पर्याय दिला आहे. लाऊडस्पीकर लावून तुम्ही गोंगाट करणार असाल तर मशिदीबाहेर आम्ही हनुमान चालिसा लावू, असे राज यांनीम्हंटले आहे. नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे महाराष्ट्र दिनी म्हणजे आजच औरंगाबादमध्ये सभा पार पडली.

राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी राज्यभरातून मनसैनिकांनी औरंगाबादमध्ये मोठी गर्दी केली होती. राज यांच्या सभेकडे राजकीय वर्तुळाचे तसेच राज्याचे लक्ष लागले होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी भोंग्यावरून राज्य सरकारला नवा अल्टिमेटम दिला आहे.

तर दुसरीकडे राज यांचं भाषण सुरू असताना मशिदीतून अजानचा आवाज ऐकू येऊ लागला. त्यानंतर राज ठाकरे हे आणखीनच भडकले. ‘माझी पोलिसांना नम्र विनंती आहे. हे जर सभेवेळी बांग सुरु करणार असतील, तर यांच्या तोंडात बोळा कोंबा. यांना सरळ शब्दांत सांगून कळत नसेल, तर राज्यात काय होईल ते मला माहीत नाही,’ असं राज म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले,  ‘उत्तर प्रदेशमध्ये लाऊडस्पीकर उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सगळेच्या सगळे लाऊडस्पीकर अनधिकृत आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की, स्थानिक पोलीस ठाण्यात विचारल्याशिवाय लाऊडस्पीकर लावू शकत नाही. किती मशिदींकडे परवानगी आहे?.’

‘संभाजीनगरमध्ये ६०० मशिदी असल्याचे मला काल सांगितले. असे फक्त संभाजीनगरमध्ये नाही तर देशभरात आहे. संपूर्ण देशातले लाऊडस्पीकर खाली आले पाहिजेत. प्रत्येक वेळा आम्हीच का भोगायचे, असे सवाल राज यांनी उपस्थित केले. तसेच संपूर्ण देशातील लाउडस्पीकर खाली आले पाहिजेत, असे राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
४ तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही, मशिदींवरचे भोंगे उतरले नाही,तर…; राज ठाकरेंचा इशारा
“भोंगे काढायला लावले, तर हातभर फाटली आणि हे म्हणतात बाबरी आम्ही पाडली”
राज ठाकरेंचं भाषण ऐन भरात असताना अजानचा भोंगा वाजला अन् संतापलेल्या ठाकरेंनी दिला ‘हा’ आदेश..
‘शेर शिवराज’ संबंधित पोस्टमुळे संतापले अमोल कोल्हे; दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी मागितली माफी

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now