raj thackeray and vasant more meet | गेल्या काही दिवसांपासून मनसे पक्षातील अंतर्गत वाद चर्चेचा विषय ठरला आहे. मनसे नेते वसंत मोरे हे पक्षातील पदाधिकाऱ्यांवर नाराज आहे. त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एक पत्रक जारी केलं होतं.
त्या पत्रकामध्ये राज ठाकरेंनी आपल्या नेत्यांना प्रसारमाध्यमांसमोर आणि सोशल मीडियावर काहीही चुकीचे बोलू नये. नाहीतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, असे म्हटले होते. हे पत्र वसंत मोरेंसाठी किंवा संदीप देशपांडेंसाठी असेल अशी चर्चा राज्यभरात होत होती. पण आता पुण्यात काही वेगळंच पाहायला मिळालं आहे.
राज ठाकरे हे सध्या दोन दिवसांसाठी पुणे दौऱ्यावर आहे. मंगळवारी त्यांनी पुण्यातील वडारवाडी भागातील दोन मनसे कार्यालयांचे उद्धाटन केले. तर धायरी भागात त्यांनी एका जनसंपर्क कार्यालयाचे उद्धाटन केले. या उद्धाटनाची जबाबदारी वसंत मोरे यांच्यावर होती.
धायरी येथे सचिन पगारे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्धाटन केले जात होते. त्यावेळी एक वेगळाच प्रसंग पाहायला मिळाला. राज ठाकरे कार्यक्रमाला आले असताना ते एका खुर्चीवर बसत होते. तेवढ्यात ते म्हणाले की, खुर्ची व्यवस्थित आहे ना? मागे कोणाची तरी खुर्ची तुटली होती?
राज ठाकरेंच्या या बोलण्यावर वसंत मोरे लगेचच म्हणाले की चंद्रकांत पाटलांची तुटली होती. त्यावेळी लगेचच राज ठाकरेंनी वसंत मोरेंकडे बघितले. त्यानंतर वसंत मोरेच म्हणाले की, साहेब तुम्ही बसा मी मागे आहे. या प्रसंगाची पुण्यात चांगलीच चर्चा आहे.
राज ठाकरे यांनी उद्धाटन केल्यानंतर ते कार्यालयात आले होते. त्यावेळी भगवी शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. मनसे नेते बाबू वागस्कर, किशोर शिंदे, वसंत मोरे हे यावेळी उपस्थित होते. त्यामुळे राज ठाकरे आणि वसंत मोरे यांच्यात कुठलीही नाराजी नसल्याचे दिसून येते.
दरम्यान, राज ठाकरेंनी एक पत्रक काढले होते. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले होते की, पक्षांर्गत बाबींवर काही बोलायचे असेल तर माझ्याशी बोला. माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा. पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी केली जाईल. राज ठाकरेंना हा इशारा नक्की कोणाला दिला होता त्यावरुन तर्कवितर्क लावले जात होते.
महत्वाच्या बातम्या-
deepali sayyad : ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने रचला होता राज ठाकरेंना ठार मारण्याचा कट; स्वीय सहायकाने केला गौप्यस्फोट
pankaj deshmukh : देशासाठी काय पण! मोठा मुलगा शहीद झाला असतानाही आईने दुसऱ्या मुलाला केलं सैन्यात भरती
‘हिंदु राष्ट्रासाठी मी तमचा वध करेल’; चिन्मय मांडलेकर साकारणार गोडसेची भूमिका, येतोय नवा चित्रपट