Share

राज ठाकरे आक्रमक; ‘हिंदू बांधवांना माझं सांगणं आहे की, तयारीत रहा; भोंगे न हटवल्यास..’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालिसा पठण केल्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषदे घेत आहेत. तर दुसरीकडे हनुमान चालिसा पठणावरुन आणि राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून सध्या जोरदार टीका होत आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत देखील राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे म्हणतात, ‘देशभरातल्या हिंदू बांधवांनो तयार राहा,३ मे पर्यंत जर त्यांना समजले नाही तर जशास तसे उत्तर देणे आवश्यक आहे. मनसे पक्ष म्हणून आमची सर्व बाजूंनी तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

‘महाराष्ट्रात आणि देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नकोत. माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही, असेही राज यांनी स्पष्ट केले. ‘माझ्या सभेमध्ये मी स्पष्ट केले होते की, हा सामाजिक विषय आहे. त्याच्याकडे त्याच अंगाने पाहणे आवश्यक असल्याचे राज यांनी सांगितले.

याचबरोबर ‘या सगळ्या गोष्टींचा मुस्लिमांनाही त्रास होत आहे. अनेक वर्षे हा विषय असाच राहिला आहे. तुम्ही पाच वेळा भोंगे लावणार असाल तर दिवसातून पाच वेळा आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू, असे राज ठाकरे म्हणाले. ‘आम्ही 3 तारखेपर्यंत शांत राहू. त्यांना या देशातल्या कायद्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा स्वतःचा धर्म मोठा वाटत असेल, तर जशाच तसं उत्तर गरजेचं आहे,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, मला दोन घोषणा करायच्या असल्याने पत्रकार परिषद बोलवण्यात आली आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा अनेक गोष्टी मी बोलेन. त्यामुळे आजची पत्रकार परिषद देशभरातल्या सर्वांना माझे एवढेच सांगने आहे भोंग्याचा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

तसेच महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली. यचबरोबर ५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला जाणार आहे. पाच तारखेला अयोध्येला पोहचून तिथे दर्शन घेणार आहे, अशी घोषणा राज यांनी केली

महत्त्वाच्या बातम्या
ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते, मनसेची शिवसेना-राष्ट्रवादीवर जहरी टीका
पवारांच्या घरावरील हल्ल्यात आमची काही चूक नाही, जे केलं ते सदावर्तेंनी केलं; आरोपींची कबुली
आधी म्हणाले छेडोंगे तो छोडेंगे नहीं, आता म्हणताय…; मशिदींवरील भोंग्याबाबत मुस्लिम संघटनेने बदलला सुर
रणबीर कपूरला लग्नात सासूकडून मिळाले तब्बल एवढ्या कोटींचे गिफ्ट, किंमत वाचून डोळे होतील पांढरे

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now