आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. तसेच, आमचे हात बांधले असून जशात तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी शोभायात्रांवरील दगडफेकीसंदर्भात दिला आहे. तसेच लवकरच संभाजी नगर येथे जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केली.
पत्रकार परिषदेत बोलताना आज राज ठाकरे यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. ते अयोध्येला जाणार आहेत. तसेच लवकरच संभाजी नगर येथे जाहीर सभा घेणार आहे. या घोषणांसोबत त्यांनी हिंदू समाजाच्या मिरवणूकांवर दगडफेक करणाऱ्यांना तसेच मशिदीवरील भोंग्यांबाबत इशारा दिला आहे.
तसेच रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रांवेळी देशातील काही भागांमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या. या घटनांवरूनही राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे. ‘समोर जे कोणतं हत्यार असेल ते आमच्याही हातात द्यायला लावू नका, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.
याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘आमच्याकडून मिरवणूक निघत असताना त्यावर दगडफेक होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, आमचे हात काही बांधलेले नाहीत,दगड आम्हालाही हातात घेता येतो,समोर जे कोणतं हत्यार असेल ते आमच्याही हातात द्यायला लावू नका, असा इशारा राज यांनी दिल्लीतील हिंसाचावरुन दिली आहे.
दरम्यान, ‘मला दोन घोषणा करायच्या असल्याने पत्रकार परिषद बोलवण्यात आली आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा अनेक गोष्टी मी बोलेन. त्यामुळे आजची पत्रकार परिषद देशभरातल्या सर्वांना माझे एवढेच सांगने आहे भोंग्याचा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे, असे ते म्हणाले.
अलीकडेच राज ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि देशभरातील मशिदींबाहेरील लाऊडस्पीकरच्या विरोधात भूमिका घेतली आणि ३ मेपर्यंत ते हटवण्याची मागणी केली आहे. तसेच काल राज यांच्या उपस्थितीत हनुमान जयंतीनिमित्त पुणे शहरात हनुमान चालीसा पठण आणि महाआरती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
आप की सरकार, काम की सरकार! भगवंत मान यांची मोठी घोषणा, ३०० युनिट वीज देणार मोफत
राज ठाकरे आक्रमक; ‘हिंदू बांधवांना माझं सांगणं आहे की, तयारीत रहा; भोंगे न हटवल्यास..’
ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते, मनसेची शिवसेना-राष्ट्रवादीवर जहरी टीका
मुंबईच्या सलग सहाव्या पराभवानंतर निराश झाला रोहित; म्हणाला, काय चूक होतेय माहिती नाही, पण…