Share

राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या ब्रिजभूषणला मोदींनी आवरावे अन्यथा…आता निर्वाणीचा इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्येला पोहोचणार आहेत. त्याला संतांचा पाठिंबा आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांना आंदोलन करण्यापासून रोखावे, अशी मागणी साध्वी कांचनगिरी यांनी केली आहे. यासंदर्भात साध्वी कांचनगिरी यांनी पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिले आहे. ब्रिजभूषण सिंह यांनी अयोध्येत आल्यानंतर राज ठाकरेंना विरोध केल्यास त्यांना माझ्यासह संतांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही साध्वी कांचनगिरी यांनी दिला. त्या गुरुवारी दिल्लीत माध्यमांशी बोलत होत्या.

साध्वी कांचनगिरी यांनी गेल्या वर्षी कृष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी कांचनगिरी यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत येण्याचे निमंत्रणही दिले होते. आता राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा निश्चित झाला असताना साध्वी कांचनगिरी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत. एवढेच नाही तर साध्वी कांचनगिरीचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यासोबत राज ठाकरे यांच्यासाठी दोन हात करण्यासही तयार आहेत. राज ठाकरे हिंदुत्वासाठी काम करत आहेत. त्यांना विरोध करताना ब्रिजभूषण सिंह यांचे हात रक्ताने माखले आहेत, असे साध्वी कांचनगिरी यांनी सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. राज ठाकरे(Raj Thakare) यांना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नाही, असे वक्तव्य भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केलं होतं. यावेळी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना सूचक इशारा देखील दिला होता.

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी काल दिल्लीत एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी अयोध्या दौऱ्यावरून ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. ‘उत्तर भारतीयांची माफी मागत नाही, तोपर्यंत राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही’ अशी भूमिका भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी घेतली आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत साध्वी कांचनगिरी देखील हजर होत्या. उत्तर भारतीयांना झालेल्या त्रासाबद्दल राज ठाकरेंनी खेद व्यक्त केल्याचे साध्वी कांचनगिरी यांनी सांगितले. साध्वी कांचनगिरी पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, “चार महिन्यांपूर्वी मी राज ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. यानंतर राज ठाकरे यांनी मला बोलावलं. माझ्याशी चर्चा केली. माझा मानसन्मान केला.”

“यावेळी मी राज ठाकरेंना विचारलं की तुम्ही उत्तर भारतीयांसोबत जे केलं ते योग्य होतं का? त्यावर राज ठाकरे यांनी उत्तर दिलं की माताजी आमचं चुकलं आहे. यासंदर्भातला व्हिडिओ मी दाखवते. त्यावेळी सर्व पत्रकार उपस्थित होते. त्यांनी एका संताची माफी मागितली आहे. तर तुम्ही देखील त्यांना माफ करावं”, असे साध्वी कांचनगिरी यांनी पत्रकार परिषदेत ब्रिजभूषण शरण सिंह यांना सांगितले.

साध्वी कांचनगिरी पत्रकार परिषदेत पुढे म्हणाल्या की, “ब्रिजभूषण शरण सिंह तुम्ही फक्त स्टेज तयार ठेवा. राज ठाकरे येऊन आपली चूक मान्य करतील आणि माफी मागतील, याची जबाबदारी माझी असेल”, असे साध्वी कांचनगिरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरेंची भेट घेऊ नये, असं आवाहन भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.

त्यावेळी कांचनगिरीने ब्रिजभूषण सिंह यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, ब्रिजभूषण सिंग यांनी ही ऑफर नाकारली. यावर साध्वी कांचनगिरी यांनीही भाष्य केले. साध्वी कांचनगिरी म्हणाल्या की, पत्रकार परिषदेत ब्रिजभूषण सिंगचे लोक माझ्याकडे टक लावून पाहत होते. ‘त्या ब्रिजभूषणला काहीच माहीत नाही, महाराष्ट्राने आपल्याला खूप काही दिले आहे, मी राजसाहेबांसोबत अयोध्येला जाणार आहे.

यावेळी साध्वी कांचनगिरी यांनीही राज ठाकरेंच्या उत्तर भारतीयांच्या भूमिकेचे समर्थन केले. तुमच्या घरात चार माणसे असतील आणि बाहेरून 10 लोक येऊन तुमचे जेवण खात असतील तर तुम्ही शांत कसे बसता?, असा सवाल कांचनगिरी यांनी केला. ब्रिजभूषण सिंग सध्या केवळ चमकोगिरीसाठी पत्रकार परिषद घेत आहेत. राज ठाकरे उत्तर भारतीयांना कसे वागवतात हे त्यांनी वारंवार दाखवून दिले आहे. मात्र ब्रिजभूषण सिंह यांनी उत्तर भारतीयांचा इतका विचार केला असता, त्यांनी येथे कंपनी सुरू करायला हवी होती, असे साध्वी कांचनगिरी म्हणाल्या.

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now