Share

अधिकाऱ्याच्या घरावर छापा; 7 BMW, मर्सिडीज,14 कोटी कॅश, सोन्या चांदीचे दागिने जप्त

नुकताच उत्तर प्रदेशातील कानपूर येथील परफ्यूम व्यापारी पियुष जैन याच्या घरावर छापा टाकला होता, ज्यामध्ये 200 कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली होती. रोकड मोजून अधिकाऱ्यांना घाम आला होता. असाच प्रकार आता समोर आला असून, चक्क बीएसएफ अधिकाऱ्यांच्या घरावर छापा टाकून अमाप संपत्ती जप्त करण्यात आली आहे. हे रोख रकमेचे गठ्ठे मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना अनेक तास घालवावे लागले.

हरियाणाच्या गुरुग्राममध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) डेप्युटी अधिकाऱ्याच्या घरावर आणि इतर ठिकाणांवर छापे टाकून अमाप संपत्ती जप्त करण्यात आली आहे. छाप्यात त्याच्या घरातून आतापर्यंत 1 कोटी रुपयांचे दागिने आणि 14 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मानेसरमधील एनएसजीमध्ये पोस्टिंगदरम्यान त्याने टेंडर मिळवून आयपीएस अधिकारी असल्याचे दाखवून डेप्युटी कमांडंटकडून 125 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

बीएसएफमध्ये तैनात असलेल्या डेप्युटी अधिकाऱ्यांच्या घरी एवढी संपत्ती मिळाल्याने अधिकारीही हैराण झाले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या रोख रकमेचे गठ्ठे मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना अनेक तास घालवावे लागले. मोजणी केल्यानंतर हे सुमारे 14 कोटी रुपये रोख असल्याचे आढळून आले.

यासोबतच एक कोटींहून अधिक किमतीचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. डेप्युटी अधिकाऱ्याच्या घरातून मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू सारखी 7 महागडी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. या वाहनांची किंमतही कोट्यावधी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

गुरुग्राम पोलिसातील एसीपी क्राइम प्रीत पाल सिंग यांनी सांगितले की, पोलिसांनी डेप्युटी कमांडंट प्रवीण यादव, त्यांची पत्नी ममता यादव, बहीण रितू आणि एका साथीदाराला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण यादवने 125 कोटींहून अधिक लोकांची फसवणूक केली आहे.

मानेसरमध्ये एनएसजीमध्ये प्रतिनियुक्तीवर असताना त्याने ही फसवणूक केली. स्वत:ला आयपीएस अधिकारी म्हणून दाखवून एनएसजीमध्ये बांधकामाची कंत्राटे मिळवून देण्याच्या नावाखाली कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची लाच घेतली. फसवणुकीची संपूर्ण रक्कम त्याने एनएसजीच्या नावाने बनावट खात्यात हस्तांतरित केली.

हे खाते प्रवीणची बहीण रितू यादव हिने उघडले होते, जी अँक्सिस बँकेत व्यवस्थापक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण यादवने शेअर मार्केटमध्ये 60 लाखांचे नुकसान केले, ते नुकसान भरून काढण्यासाठी त्याने फसवणुकीचा खेळ खेळला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीणची पोस्टिंग या दिवसांत आगरतळा येथे होती, परंतु त्याने इतके पैसे कमावले होते की काही दिवसांपूर्वी त्याने रिजाइन लेटर लिहिले होते. जे आता स्वीकारण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने उत्तर प्रदेशातील कानपूर येथील परफ्यूम व्यापारी पियुष जैन याच्या घरावर छापा टाकला होता, ज्यामध्ये 200 कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या
ज्या खासदाराला मोदी सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला तो निघाला चीनचा गुप्तहेर; जगभरात खळबळ
चीनच्या गुप्तहेराला मोदी सरकारने दिला पद्मश्री; देशाला हादरवून टाकणारी माहिती आली समोर
फक्त ४७ रुपयांचा ‘हा’ शेअर देतोय तब्बल १४५ टक्के परतावा; गुंतवणूकदार होताय मालामाल

क्राईम

Join WhatsApp

Join Now