देहरादुन। राज्यातील राजकारण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलेच चर्चेत असते. यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी राजकारणातील सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरतात. विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका करणे असो किंवा वाढत्या पेट्रोल दरवाढीवर केंद्र सरकारला धारेवर धरणे असो, अशा कोणत्या ना कोणत्या वादामुळे राहुल गांधी सतत चर्चेत असतात.
मात्र यावेळी राहुल गांधींनाच आश्चर्याचा धक्का बसला असेल असे म्हणायला हरकत नाही. कारण यावेळी ते कोणत्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नाही तर एका वृद्ध महिलेच्या आशिर्वादामुळे चर्चेत आले आहेत. देहरादुन मधील ७८ वर्षाच्या एका वृद्ध महिलेच्या मनावर राहुल गांधींच्या विचारांचा वेगळाच प्रभाव पडला. त्यामुळे त्यांनी एक मोठा निर्णय घेतला.
त्या वृद्ध महिलेने चक्क राहुल गांधींच्या नावावर आपली संपूर्ण संपत्ती केली. पुष्पा मुन्जियाल असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूनंतर राहुल गांधी त्यांच्या सर्व संपत्तीचे मालक असल्याची घोषणा त्यांनी केली. एवढेच नाही तर त्यांनी त्याबाबतचे मृत्युपत्र तयार करून देहरादुन मधील कोर्टात सादर केले. यामध्ये ५० लाखांची मालमत्ता आणि १० तोळे सोन्याचा समावेश आहे.
दरम्यान, पुष्पा मुन्जियाल या वृद्ध महिलेने त्यांचे मृत्यूपत्र माजी प्रदेशाध्यक्ष प्रितम सिंह यांच्याकडे सुपूर्त केले आहे. याबाबतची सविस्तर माहिती काँग्रेसचे महानगर अध्यक्ष लालचंद शर्मा यांनी दिली आहे. तसेच याबाबत पुष्पा मुन्जियाल यांना विचारले असता त्यांनी राहुल गांधी यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच गांधी घराण्याचे आभार मानले.
पुष्पा मुन्जियाल यांनी सांगितले, राहुल गांधी आणि त्यांचे विचार आपल्या देशासाठी गरजेचे आहेत. राहुल गांधींच्या विचारांनी मला खूप प्रभावित केले आहे. तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधी घराण्याने अनेक बलिदान दिले आहे. राहून गांधींच्या कुटुंबाने देशासाठी अनेक मोठ्या कामगिरी केल्या आहेत.
इंदिरा गांधी, राजीव गांधी नेहमीच देशाच्या हितासाठी लढले आहेत. आणि आता राहुल गांधी देखील देशासाठी गरजेचे आहे. त्यांचे विचार नक्कीच देशाला प्रगतीपथावर नेतील. त्यामुळे मी त्यांच्या विचारांवर प्रभावित होऊन माझी संपूर्ण संपत्ती त्यांच्या नावावर करत असल्याचे त्यांनी त्यांच्या मृत्युपत्रात सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
राजामौलींनी प्रेमासाठी तोडली सगळी बंधने, घटस्फोट झालेल्या ‘या’ फॅशन डिझायनरसोबत केलं आहे लग्न
सोशल मिडीयावर व्हायरल झालेले ‘हे’ फोटो पाहून २२ कोटी श्रीलंकन नागरिक संतापले, दिल्या अशा प्रतिक्रिया
भारताच्या ‘या’ भागात सापडली सर्वात मोठी गुहा, आतले दृश्य पाहून लोकं हैराण; शिवलिंगावर…