केंद्र सरकारने लष्करात भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेला (Agneepath Yojana) देशातील अनेक भागांतून विरोध होताना दिसत आहे. याचे पडसाद देशभरात उमटले आहे. भरतीसाठी केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात ओडिसामध्ये अनेक ठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत.
मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणासह विविध राज्यांमध्ये शुक्रवारी हिंसक निदर्शने सुरूच होती. बिहारमधील जहानाबाद आणि नवादा या ठिकाणी तरुण विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे.
यावेळी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी(Student) वाहनांवर दगडफेक देखील केली आहे. याशिवाय देशभरात या योजनेला विरोध होत आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात देखील आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. कोंग्रेस थेट मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
या योजनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘केंद्राला तीन कृषी कायद्यांसारखंच ही योजनाही मागे घ्यावी लागेल,’ असं म्हणत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
वाचा ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी काय म्हंटलं आहे. ‘सलग आठ वर्षांपासून भाजपाने ‘जय जवान, जय किसान’च्या योजनेच्या मूल्यांचा अपमान करत आहे. मी आधीही सांगितलं होतं की पंतप्रधानांना कृषी कायदे मागे घ्यावे लागतील. त्याच पद्धतीने त्यांना आता तरुणांचं ऐकून पुन्हा माफिवीर बनावं लागेल आणि अग्निपथ मागे घ्यावं लागेल,’ असं त्यांनी ट्विट केलं.
8 सालों से लगातार भाजपा सरकार ने ‘जय जवान, जय किसान' के मूल्यों का अपमान किया है।
मैंने पहले भी कहा था कि प्रधानमंत्री जी को काले कृषि कानून वापस लेने पड़ेंगे।
ठीक उसी तरह उन्हें ‘माफ़ीवीर' बनकर देश के युवाओं की बात माननी पड़ेगी और 'अग्निपथ' को वापस लेना ही पड़ेगा।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 18, 2022
दरम्यान, केंद्र सरकारने तरुणांना सैन्यात भरती करण्याच्या उद्देशाने अग्निपथ योजना आणली आहे. या माध्यमातून दरवर्षी सुमारे ४५ हजार तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात नोकरी मिळणार आहे. नोकरी मिळवण्यासाठी तरुणांचे वय १७.५ ते २१ वर्षे दरम्यान असावे. त्याचबरोबर त्यांच्या कार्यक्षमतेच्या आधारावर चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर यातील २५ टक्के तरुणांना कायमस्वरूपी केडरमध्ये भरती केले जाईल आणि उर्वरितांना सैन्यातून निवृत्त केले जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
VIDEO: राखी सावंतला बॉयफ्रेंडने गिफ्ट केले दुबईत अलिशान घर, समोर आली घराची पहिली झलक
VIDEO: साक्षी धोनीने चाहत्यांना दिला सुखद धक्का, घरी झालं नवीन पाहुणीचं आगमन, पाहून म्हणाल ‘क्युट’
VIDEO: गरिब मुलांनी कार्तिक आर्यनसाठी केलं असं काही की नेटकरी म्हणाले, ‘हे आहेत खरे चाहते’
१५ वर्षे विभक्त राहूनही जुळ्या बहिणींनी १० वीच्या परीक्षेत मिळवले सारखेच गुण, सर्वच झाले आश्चर्यचकित