राज्यातील राजकारण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलेच चर्चेत असते. यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी राजकारणातील सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरतात. विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका करणे असो किंवा वाढत्या पेट्रोल दरवाढीवर केंद्र सरकारला धारेवर धरणे असो, अशा कोणत्या ना कोणत्या वादामुळे राहुल गांधी सतत चर्चेत असतात.
पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. येत्या दीड वर्षात तब्बल 10 लाख पदांची भरती करण्यात यावी, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबधित विभागांना दिले. तसेच मंगळवारी याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विट करून देण्यात आली आहे.
याचाच धागा पकडत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करताना जुन्या आश्वासनाची आठवण करुन दिली आहे. ‘मोदी सरकार जुमला नाहीतर ‘महा’जुमला सरकार,’ असल्याची जहरी टीका राहुल गांधी केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
जैसे 8 साल पहले युवाओं को हर साल 2 करोड़ नौकरियों का झांसा दिया था, वैसे ही अब 10 लाख सरकारी नौकरियों की बारी है।
ये जुमलों की नहीं, 'महा जुमलों' की सरकार है।
प्रधानमंत्री जी नौकरियां बनाने में नहीं, नौकरियों पर 'News' बनाने में एक्सपर्ट हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 14, 2022
ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात, ‘मोदी यांचं सरकार 8 वर्षांपूर्वी सत्तेत आलं त्यावेळी दरवर्षी 2 कोटी नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्याप्रमाणं आता 10 लाख नोकऱ्यांचं आश्वासन देण्यात आलं आहे,’ असं राहुल गांधी यांनी म्हंटले आहे. पुढे ट्विटमध्ये त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, पुढे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘मोदी सरकार नोकरीच्या संधी देत नाहीये, तर रोजगाराच्या नावाखाली जाहीरात करण्याच काम करत आहे,’ अशा शेलक्या शब्दात राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्या काळात अनेकांनी आपला रोजगार गमवला. यामुळे अनेकांना आर्थिक परिस्थितीचा जबर फटका बसला. त्यामुळे हजारो रिक्त पदं केंद्र सरकारमध्ये असून ही पदभरती केव्हा केली जाणार, असा सवाल उपस्थित केला जात होता.
महत्वाच्या बातम्या-
राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्याने केलं ‘हे’ हैराण करणारं काम, बाळा नांदगावकरांनीही केलं कौतूक
पंकजा मुंडेंचा राजकीय एन्काऊंटर करण्याचा भाजपचा प्रयत्न; महाजनांनी उघड केले आतले सत्य
दिपिका पदूकोनची तब्येत बिघडली; ह्रदयविकाराच्या त्रासामुळे तातडीने हाॅस्पीटलमध्ये केलं दाखल