Share

Rahul Gandhi Push Ups Penalty : राहुल गांधींना काँग्रेस शिबिरात शिक्षा! दोन मिनिटांचा उशीर पडला महागात, 10 पुशअपची ‘पेनल्टी’

Rahul Gandhi Push Ups Penalty : राजकीय नेत्यांना शिस्त पाळायला सांगणारे राहुल गांधी (Rahul Gandhi) स्वतःच शिस्तीचे उदाहरण बनले आहेत. मध्यप्रदेशातील पचमढी (Pachmarhi, Madhya Pradesh) येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधींना फक्त दोन मिनिटांचा उशीर झाला, मात्र त्या दोन मिनिटांनी त्यांना 10 पुशअप काढण्याची शिक्षा मिळाली. या घटनेने पुन्हा एकदा त्यांच्या शिस्तप्रियतेची चर्चा रंगली आहे.

काँग्रेस शिबिरातील समान नियम सर्वांसाठी

या शिबिरात कोणालाही विशेष सवलत दिली जात नाही, असा दावा काँग्रेसचे मीडिया समन्वयक अभिनव बरोलिया (Abhinav Barolia) यांनी केला. त्यांनी सांगितले की, “आमच्या पक्षात सर्व कार्यकर्त्यांसाठी एकच नियम आहे. राहुलजींना सुद्धा त्याच शिस्तीचे पालन करावे लागते. आमच्याकडे भाजपसारखी बॉसगिरी नाही.”

प्रशिक्षण शिबिरातील ठरलेली शिक्षा

पक्ष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव (Sachin Rao) यांनी ‘संगठन सृजन अभियान’ अंतर्गत या शिबिरात शिस्तभंग करणाऱ्यांसाठी ठरलेली शिक्षा ठेवली होती. वेळेत न आल्यास 10 पुशअप काढणे ही शिक्षा सर्वांसाठी बंधनकारक आहे. संघटना मजबूत करण्यासाठी हा कार्यक्रम 11 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

बिहार प्रचार मोहिमेकडे प्रस्थान

त्या दिवशीच राहुल गांधी बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले. गेल्या पाच महिन्यांत मध्यप्रदेशचा हा त्यांचा दुसरा दौरा होता. जून महिन्यात त्यांनी ‘संगठन सृजन अभियान’ची सुरुवात केली होती आणि आता ते त्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत आहेत.

भाजप व निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

अलीकडेच राहुल गांधींनी भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) आणि निवडणूक आयोग (Election Commission) यांच्यावर हरियाणा राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदार यादीतील फेरफार केल्याचा आरोप केला होता. त्यांनी सांगितले की, “हरियाणात तब्बल २५ लाख मतदार बनावट पद्धतीने जोडले गेले असून काँग्रेसकडे त्याचे पुरावे आहेत, ते लवकरच सार्वजनिक केले जातील.”

भाजपकडून पलटवार

दरम्यान, भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला (Shehzad Poonawalla) यांनी राहुल गांधींवर हल्ला चढवला. त्यांनी टोला लगावत म्हटले की, “राहुल गांधींसाठी LOP म्हणजे ‘लीडर ऑफ टूरिझम अँड पार्टी’. बिहारमध्ये निवडणुका सुरू आहेत आणि ते पचमढीत सफारी करत आहेत. पराभवानंतर ते नेहमीप्रमाणे निवडणूक आयोगालाच दोष देतील.” या संपूर्ण घटनेमुळे काँग्रेसच्या शिबिरातील शिस्तबद्धता आणि राहुल गांधींच्या आचारशैलीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now