गुजरातमध्ये बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तब्बल 28 बँकांना शिपयार्ड कंपनीनं 22 हजार 842 कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. CBI ने ABG शिपयार्ड आणि त्याचे तत्कालीन अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह अन्य 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (rahul gandhi hits out at modi government over bank fraud)
तसेच काल दिवसभर या कंपन्यांच्या कार्यालयांवर सीबीआयकडून छापेमारी सुरू होती. एबीजी शिपयार्ड लि. आणि तिचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतरांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.
यावरून आता राजकारण रंगले आहे. या प्रकरणावरून मोदी सरकारवर काँग्रेसकडून टीका केली जात आहे. याबाबत ट्विट करत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर तिखट शब्दात टीका केली आहे. राहुल गांधींच्या ट्विटची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
“मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक झालेली आहे. ७५ वर्षांमध्ये भारतातील जनतेच्या पैशाची एवढी फसवणूक झालेली नाही. लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदी मित्रांसाठी ‘अच्छे दिन’ आहेत.” असं राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच “भारतात आज पंतप्रधान नसून एक असा राजा आहे, ज्याला वाटतं की तो निर्णय घेत असताना लोकांनी शांत बसावं” असं म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. तसेच “भाजपाला खरा हिंदुस्थान दाखवू” असं म्हणत त्यांनी निशाणा साधला होता.
“देशातल्या 55 कोटी लोकांकडे जेवढी संपत्ती आहे त्यापेक्षा जास्त संपत्ती ही अदानी आणि अंबानींकडे आहे, देशातील उद्योगांमध्ये एकाधिकारशाही तयार होऊन ते सर्व अदानी-अंबानींच्या हाती देण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे,’ अशी टीका ही राहुल गांधी यांनी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
हिजाबप्रकरणी ठाम भूमिका घेतल्याने जीवे मारण्याच्या धमक्या; भाजपा आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
..आणि मिठी मारून दीर भावजयीने भररस्त्यात सोडला जीव, सत्य समोर आल्यानंतर पोलिसही हादरले
वाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन तणाव; वाचा नक्की काय घडलं?
मोठी बातमी! ग्रामसभेची ‘ती’ विनंती मान्य करत अण्णा हजारेंनी वाईन विक्रीविरोधातील आंदोलन घेतले मागे