Share

दुसऱ्या कसोटीनंतर ‘हा’ माजी कर्णधार घेणार निवृत्ती, राहुल द्रविडने दिल्या शुभेच्छा

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या सामन्यानंतर एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, तो खेळाडू आता क्रिकेट मधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर करणार आहे.  हा खेळाडू 2009 पासून क्रिकेट खेळतोय. नुकताच सहकारी खेळाडूंनी त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला.

क्रिकेट मधून निवृत्त होणारा हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल आहे. लकमनलचं याआधीच क्रिकेटला अलविदा करण्याचं ठरवलं होतं. सुरंगाने 2009 मध्ये टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय पदार्पण केलं होतं.

सुरंगाने श्रीलंकेचं तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. त्याने आतापर्यंत 68 कसोटी सामन्यांमध्ये 168 विकेट्स घेतल्या आहेत. लकमलने यामध्ये  4 वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तसेच 86 वनडेमध्ये 109 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.

https://twitter.com/BCCI/status/1503037410502152192?t=EBqYYbyyQil5VzT4tbTSRw&s=19

दरम्यान, राहुल द्रविड आणि कोहली यांनी श्रीलंकेचा जलद गोलंदाज सुरंगा लकमल यांची भेट घेतली आणि त्याला शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ शेअर करताना बोर्डाने म्हटले आहे की, हेड कोच राहुल द्रविड आणि माजी कर्णधार विराट कोहली यांनी सुरंगा लकमल याला शुभेच्छा दिल्या. तो अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे.

लकमलने डिसेंबर 2009 मध्ये नागपुरात भारताविरुद्ध पदार्पण केले. सुमारे एक वर्षानंतर, नोव्हेंबर 2010 मध्ये, त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले, तर त्याच्या आंतरराष्ट्रीय टी 20 कारकिर्दीला 2011 मध्ये सुरुवात झाली. लकमलने आतापर्यंत एकूण 68 कसोटी सामने खेळले.

11 टी-20 मध्ये त्याला केवळ 8 विकेट मिळाल्या. भारताविरुद्ध, लकमलने 2 कसोटीत 8 विकेट, तर 11 एकदिवसीय सामन्यात 9 विकेट घेतल्या, दुसरीकडे एकमेव टी-20 मध्ये त्याला कोणतेही यश मिळाले नाही. नुकतेच त्याने श्रीलंका बोर्डाचे आभार व्यक्त केले आहेत.

खेळ

Join WhatsApp

Join Now