Share

Rahul Dravid : भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्येही खेळण्याची परवानगी दिली पाहीजे; पराभवानंतर द्रविडची मागणी

rahul dravid

rahul dravid on foreign country league  | टी २० वर्ल्डकप २०२२ मध्ये भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दहा विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघ टी २० वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. अॅडलेडमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी १६९ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी १६ षटकांत पूर्ण केले.

भारताच्या पराभवानंतर आता रोहित शर्मा, विराट कोहली, आर. अश्विन, मोहम्मद शमी यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीबाबतही चर्चा सुरू झाली आहे. आता भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्या निवृत्तीबाबत बोलणे खुप घाईचे होईल, असे राहूल द्रविडने म्हटले आहे. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत राहुल द्रविड म्हणाला की, सेमी फायनलमध्ये पराभव झाल्यामुळे लगेचच वरिष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीबाबत बोलणे मला योग्य वाटत नाही.

तसेच पुढे तो म्हणाला की, पुढच्या वर्ल्डकपला अजून दोन वर्षे आहे. तोपर्यंत आमच्याकडे वेळ आहे. संघात काही दर्जेदार खेळाडू आहेत. यावर बोलण्याची किंवा विचार करण्याची ही योग्य वेळ नाही. पुढच्या वर्ल्डकपची तयारी करण्यासाठी आमच्याकडे भरपूर वेळ आहे.

भारतीय संघाला परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगीही दिली पाहिजे, असेही राहूल द्रविडने यावेळी म्हटले आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना BBL मध्ये खेळण्याची परवानगी आहे. ती ऑस्ट्रेलियात होते. भारतीय खेळाडूंना परदेशी मैदानावर जास्त संधी मिळाली तर भारतीय संघाला त्या अभुवनाचा फायदा होईल, असे राहूल द्रविडने म्हटले आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ६ विकेट्स गमावून १६८ धावांची मोठी धावसंख्या उभारली. हार्दिकने ३३ चेंडूत ६३ धावांची जलद खेळी खेळली. यादरम्यान त्याने ५ षटकार आणि ४ चौकार मारले.

तसेच कोहलीने ४० चेंडूत ५० धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात इंग्लंडने २४ चेंडू राखून लक्ष्य गाठले. जोस बटलरने ४९ चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ८० धावा केल्या. त्याचवेळी, अॅलेक्स हेल्सने ४७ चेंडूत चार चौकार आणि सात षटकारांसह नाबाद ८६ धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या-
Cricket: घरात एकच बाप असावा, सात सात बाप असतील तर..; जडेजाची टिका रोहीत शर्माला झोंबणार
Cricket : विराट, रोहितची टी-२० संघातून कायमची हकालपट्टी; BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
rohit : विराट कोहली आणि रोहीत शर्मा निवृत्ती घेणार? राहूल द्रविडने अगदी स्पष्टच सांगीतलं..

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now