Share

मुलीने आयोजित केलेल्या मैफिलींना राहुल देशपांडे जातो पण.., शरद पवारांनी बोलून दाखवली नाराजी

पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गीतकार राहूल देशपांडे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राहूल देशपांडेंनी अद्याप माझे निमंत्रण स्वीकारले नसल्याची खंत शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात पार पडलेल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे १३ वा स्व. राम कदम कलागौरव पुरस्कारावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला अनेक कलाकारांनी आपली उपस्थिती दर्शविली होती. यावेळी अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि राहुल देशपांडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानंतर कार्यक्रमाला अनुसरुन भाष्य करताना, दिवाळीच्या निमित्ताने मी आयोजित करीत असलेल्या संगीत मैफलींना अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली.

पण राहुलने अद्यापही निमंत्रण स्वीकारलेले नाही. मुलीने आयोजित केलेल्या मैफलीला राहुल जातो, पण माझ्या निमंत्रणाचा त्याने स्वीकार केलेला नाही. अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त करुन दाखवली. विशेष म्हणजे शरद पवार म्हणाले, गायक शंकर महादेवन यांनी आयुष्यात एक चांगली गोष्ट केली, ती म्हणजे मराठी मुलीशी लग्न.

मराठी पत्नीमुळे त्यांना मराठी माणसाला कोणत्या प्रकारचे संगीत आवडते, मराठी माणसाची रुची काय ते कळले. शरद पवारांचे हे बोल ऐकून राहूल देशपांडे आणि शंकर महादेवन यांच्या गालावर हसू उमटले. यामध्ये पुणेकरांनी देखील पवारांच्या टोलेबाजीचा आनंद घेतला.

संगीत, साहित्य आणि नाटकांचा व्यासंग असलेल्या पवारांनी गायक शंकर महादेवन यांच्या ‘सूर निरागस हो’ या गीतामध्ये ही सुर मिसळले. शब्दसुरांच्या मैफलीचा पुणेकरांनी भरभरुन आनंद लुटला. दरम्यान राम कदम कला गौरव पुरस्कार 2009 मध्ये लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हान यांना देण्यात आला होता.

यानंतर या पुरस्काराचे अनेक कलाकार, गीतकार मानकरी ठरले. यामध्ये संगीतकार अजय अतूल, गायिका उषा मंगेशकर, अशोक पत्की यांचा समावेश आहे. यावर्षी राहूल देशपांडे आणि शंकर महादेवन यांना १३ वा स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या
शेअर छोटा फायदा मोठा! ३५ पैशांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदार मालामाल, १ लाखांचे झाले १० कोटी
राजपूत कुटुंबात जन्म, खासदार झाल्यानंतर झाला होता जीवघेणा हल्ला, वाचा योगींची संघर्षमय कहाणी
स्मृती मानधना-हरमनप्रीत कौरने मोडले अनेक विक्रम, वेस्ट इंडिजला धूळ चारत भारताचा मोठा विजय
योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचं ‘नाथ संप्रदाय’ कनेक्शन तुम्हाला माहिती आहे का?

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now