राहुल गांधी(Rahul Gandhi)महागाई विरोधात आज दिल्लीमध्ये काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसचे नेते काळे कपडे घालून रस्त्यावर उतरले आहेत. मात्र दिल्ली पोलिसांनी या मोर्चासाठी काँग्रेसला परवानगी दिलेली नव्हती. म्हणून त्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
फक्त महागाई विरोधातच नाही तर बेरोजगारीविरोधात आणि ईडीच्या कारवायांविरोधातदेखील हे आंदोलन छेडले आहे. अनेक नेते आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यापैकी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप इत्यादी आहेत.
काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीसा पाठवल्या आहेत. अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल गांधी काँग्रेस खासदारांसह संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत पदयात्रा काढत होते. व काही काँग्रेसचे नेते विजय चौकात धरणे धरून बसले होते. मात्र पोलिसांनी त्यांना विजय चौकातच रोखले आणि त्यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामध्ये प्रियंका गांधींचादेखील समावेश आहे. त्यांना अक्षरशः फरफटत नेलंय.
वाढती जीएसटी, लष्कराची अग्निपथ योजना, वाढती महागाई, बेरोजगारी, आणि कंत्राटी पद्धतीच्या विरोधात काँग्रेसने पुकारलेला सत्याग्रह जोपर्यंत सरकार कोणताही दिलासा देत नाही, तोपर्यंत सुरूच ठेवणार असल्याचे काँग्रेस नेत्या अल्का लांबा यांनी म्हटले आहे. आज काँग्रेस देशभरात आंदोलन करीत आहेत.
आंदोलनाला परवानगी नसल्याने काही चुकीचे घडू नये, या विचाराने दिल्ली वाहतूक पोलिसांनी लोकांना नवी दिल्लीतील अनेक मार्ग टाळण्याचा सल्ला दिला आहे. कार्यकर्त्यांची सरकारविरोधात जोरदार घोषणा सुरू आहे. काँग्रेस कार्यकर्ते रात्रीपासूनच आपल्या मुख्यालयापुढे येऊन बसलेले आहे. राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा व यूपीमधील कार्यकर्ते दिल्लीत पोहोचलेत. दिल्लीतील राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाला देखील काँग्रेस घेरा घालणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर सोडता नवी दिल्लीच्या संपूर्ण भागात कलम 144 लागू आहे.
महत्वाच्या बातम्या
Arjun Rampal: पत्नीला घटस्फोट देऊन १५ वर्षांनी लहान मॉडेलसोबत केलं लग्न, आता आहे अविवाहित बाप
Bitcoin: एका चुकीमुळे कचऱ्याखाली दबला २००० कोटींचा खजाना, रोबोट डॉग ‘असा’ घेतोय त्याचा शोध
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या जागी आदित्य ठाकरे, तर आदित्य ठाकरेंच्या जागी तेजस ठाकरे; शिवसेनेत होणार मोठे फेरबदल
Arjun Rampal: पत्नीला घटस्फोट देऊन १५ वर्षांनी लहान मॉडेलसोबत केलं लग्न, आता आहे अविवाहित बाप