रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या बाळाचे नाव जाहीर केले आहे. आलियाने आपल्या मुलीचे नाव राहा ठेवले आहे. आई- वडील झालेले आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पालकत्वाचा आनंद घेत आहेत. या दोघांच्या घरी ६ नोव्हेंबर रोजी एक लाडकी परी आली.
तिच्या मुलीच्या जन्मापासूनच मुलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते सतत उत्सुकता होते. तसेच ते मुलीच्या नावाबद्दलही खूप उत्सुक होते. दरम्यान, आलिया आणि रणबीरने एका पोस्टने चाहत्यांची प्रतीक्षा संपवली. या स्टार जोडप्याने चाहत्यांची प्रतीक्षा संपवली आणि एका पोस्टसह छोट्या परीचे नाव उघड केले.
आलिया भट्टने तिचा रणबीरसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया एका बाजूला उभी आहे आणि रणबीरचा बाजूला चेहरा दिसत आहे. रणबीरने मुलीला मांडीवर घेतले आहे.
मुलीचा चेहरा दिसत नसला तरी मुलीचे डोके मात्र नक्की दिसते. हा सुंदर फोटो शेअर करत आलियाने एक लांबलचक पोस्ट लिहिली आणि मुलीचे वेगळे नाव सांगितले.
आलिया अधिकृत इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हणाली की- ‘मुलीचे नाव राहा नाव ठेवलय. तिच्या प्रिय आजीने (नीतू कपूर) हे नाव ठेवले. ज्याचे अनेक अर्थ आहेत. राहा म्हणजे दिव्य मार्ग. स्वाहिलीमध्ये याचा अर्थ आनंदी असा होतो. संस्कृतमध्ये राहा म्हणजे वंश वाढवणारा. बंगालीमध्ये – राहाचा अर्थ आराम. तर अरबी भाषेत याचा अर्थ शांतता असा होतो.
या नावाचा अर्थ आनंद, स्वातंत्र्य आणि आनंद देखील आहे. राहा, धन्यवाद, आमच्या कुटुंबाला पुन्हा नवे जीवन दिल्याबद्दल, असे जीवन जणू काही आमच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली आहे.
विशेष म्हणजे आलियाने ६ नोव्हेंबरला एका मुलीला जन्म दिला. त्याचवेळी, आलिया-रणबीरच्या मुलीचे नाव काय असेल, अशी चर्चा सुरू होती. ते मुलीचे नाव काय ठेवणार? मात्र, आता त्यांनी आपल्या मुलीचे नाव सार्वजनिक केले आहे, जे राहा आहे आणि ते खूप गोंडस नाव आहे.
महत्वाच्या बातम्या-
Mumbai :मस्ती मस्तीत मित्रांनी मिळून तरुणाच्या पार्श्वभागात घातलं लाटणं अन् नंतर..; मुंबईतील घटनेने उडाली खळबळ
दिनेश कार्तिक घेणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; भावूक होत म्हणाला संघातील सर्व खेळाडूंनी खूपच..
भाजप-शिंदे सरकार कोसळणार, पडद्यामागे राजकीय भूकंपाची तयारी; केंद्रातील नेत्यांनाही लागलीय भनक